डेविड वॉर्नर याच्या टिकटॉक व्हिडिओने 'Pokiri' चे दिग्दर्शक प्रभावित, चित्रपटात कॅमिओची दिली ऑफर (Watch Video)

दिग्दर्शक पुरी जगन्नाथवर वॉर्नरचा हा व्हिडिओ खूपच प्रभावित झाला. ते म्हणाले की हा संवाद वॉर्नरच्या आक्रमक वृत्तीस अनुरूप आहे.

डेविड वॉर्नर (Photo Credits: IANS)

ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) सध्या लॉकडाउनमध्ये त्याच्या टिकटॉक व्हिडिओने चर्चेचा विषय बनला आहे. वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉकवर (TikTok) डेब्यू केले आणि आता तो चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. यावेळी कोरोना व्हायरसचा प्रभाव संपूर्ण जगामध्ये दिसून येत आहे ज्यामुळे क्रीडा स्पर्धा थांबविण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत क्रिकेटपटू आपला मोकळा वेळ कुटुंबातील सदस्यांसह घरी घालवत आहेत. यामुळे वॉर्नरने मोकळ्या वेळेची भरपाई करण्यासाठी टिकटॉक व्हिडिओ बनविणे सुरू केले आहे. वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो ‘पोखरी’ (Pokiri) या तमिळ चित्रपटाचा एक डायलॉग बोलताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये महेश बाबूने नायकाची भूमिका केली होती. वॉर्नरच्या या कृतीने सर्वांना प्रभावित केले. इतकेच नाहीत तर टॉलीवूडच्या एका दिग्दर्शकाने वॉर्नरला त्याच्या सिनेमात कॅमिओची ऑफरही दिली. (VIDEO: डेविड वॉर्नर याने पत्नी Candice सह तेलगू गाणे Butta Bomma वर केला मजेदार डांन्स, स्टार अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला धन्यवाद)

वॉर्नरने चित्रपटाच्या डायलॉगने लोकांची मनं जिंकली. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना चित्रपटाचे नाव ओळखण्यास सांगितले. 'पोकीरी' चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannadh) या प्रश्नाचे उत्तर देतील याची वॉर्नरने कल्पना केली नव्हती. दिग्दर्शक पुरी जगन्नाथवर वॉर्नरचा हा व्हिडिओ खूपच प्रभावित झाला. ते म्हणाले की हा संवाद वॉर्नरच्या आक्रमक वृत्तीस अनुरूप आहे. इतकेच नाही तर तो आपल्या चित्रपटासाठी एक कॅमिओ करेल अशीहीपुरीने आशा व्यक्त केली. पाहा पुरी यांचे ट्विट:

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वॉर्नरने पत्नी कॅंडिससोबत अल्लू अर्जुनच्या सुपरहिट तेलगू गाण्यावर 'बट्टा बोम्मा' गाण्यावर डांन्स केला होता. वॉर्नरच्या त्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनने कमेंट केली आणि त्याचे कौतुक केले. वॉर्नर आयपीएलमध्ये वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो, ज्यामुळे हैदराबादमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. आणि यामुळेच त्याच्या तामिळ गाणी आणि संवादांवर बनवलेले व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे.