Sarfaraz Khan: सूर्याच्या अनुपस्थितीत सरफराज खानची मुंबई इंडियन्समध्ये वर्णी?

आयपीएल 2024 च्या लिलावात सरफराज खानवर कोणत्याही संघानं बोली लावलेली नव्हती. तो आयपीएल 2024 च्या लिलावात अनसोल्ड राहिला.

Sarfaraz Khan:  सूर्याच्या अनुपस्थितीत सरफराज खानची मुंबई इंडियन्समध्ये वर्णी?

टीम इंडियाचा (Team India) मिस्टर 360 सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे आगामी आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये सूर्यकुमार यादव खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सराव सुरू केला आहे. रोहितच्या कर्णधारपदावरुन निर्माण झालेली कॉन्ट्रोवर्सी आणि त्यातच आता सूर्याही खेळताना दिसणार नसल्यामुळे मुंबईच्या फॅन्समध्ये कमालीची नाराजी दिसत आहे. मात्र आता सुर्याच्या दुखापतीमुळे मुंबईत नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.  सूर्याच्या अनुपस्थितीत सरफराज खानची (Sarfaraz Khan) आयपीएल 2024 (IPL 2024) सीझनसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाच वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (हेही वाचा - IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि केन विल्यमसचा जोरदार सराव, व्हिडिओ पहा)

डिसेंबरपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या सूर्यकुमारचीही मंगळवारी एनसीएमध्ये फिटनेस चाचणी झाली. त्यानंतर सूर्यकुमार अजूनही खेळण्यासाठी फिट नसल्याचं समोर आलं. मात्र, आता गुरुवारी त्याची पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतरच सूर्या आगामी आयपीएल सीझन खेळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.  यामुळे सद्या सर्फराजची वर्णी लागते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयपीएल 2024 च्या लिलावात सरफराज खानवर कोणत्याही संघानं बोली लावलेली नव्हती. तो आयपीएल 2024 च्या लिलावात अनसोल्ड राहिला. दरम्यान, आता असं सांगितलं जात आहे की, सरफराज खान मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होऊ शकतो. जर गरज भासली तर सरफराज खान मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2024 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).