Pandya Brothers Join Mumbai Indians Camp: आयपीएल 13 पूर्वी मुंबई इंडियन्स कॅम्पसाठी जसप्रीत बुमराह, क्रुणाल आणि हार्दिक पांड्या मुंबईत दाखल
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर सर्व संघ इंडियन प्रीमिअर लीग 2020 साठी आपल्या बेसवर पोहचत आहेत. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात पांड्या बंधू (कृणाल आणि हार्दिक) बरोडाहून आणि जसप्रीत बुमराह अहमदाबादहुन मुंबईला पोहचले आहेत. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पांड्या ब्रदर्स आणि बुमराहचे फोटो शेअर केले आहेत.
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर सर्व संघ इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 साठी आपल्या बेसवर पोहचत आहेत. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सराव सत्रात पांड्या बंधू (कृणाल आणि हार्दिक) बरोडाहून आणि जसप्रीत बुमराह अहमदाबादहुन मुंबईला पोहचले आहेत. सर्व फ्रॅन्चायझी 20 ऑगस्टनंतर संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे रवाना होणार आहे. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि मुंबईत राहणारे इतर खेळाडू यापूर्वी सराव सत्रात दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सचे ईशान किशन आणि राहुल चाहरदेखील मुंबईत दाखल झाले आहेत. यापूर्वी, फ्रॅन्चायझीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर कर्णधार रोहित शर्माचा नेटमध्ये सराव करतानाच व्हिडिओ शेअर केला होता. लॉकडाऊननंतर तब्बल 195 दिवसांनी रोहित शर्मा मैदानात उतरला. सराव सत्रात रोहित तुफान फलंदाजी करताना दिसला आणि त्याला पाहून चाहत्यांनाही त्यांचा उत्साह आवरता आला नाही. (Rohit Sharma Hits The Nets: 'प्रतीक्षा Ro-over'! 195 दिवसानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची नेट्समध्ये दमदार फटकेबाजी, पाहा व्हिडिओ)
आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पांड्या ब्रदर्स आणि बुमराहचे फोटो शेअर केले आहेत. इथे पाहा:
अहमदाबाद ते मुंबई
View this post on Instagram
BOOM checks in! ✅💙 . Ahmedabad to Mumbai by road 🚘 . #OneFamily @jaspritb1
A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on
बडोदाटो येथून आमची मुंबई पर्यंत ड्राईव्ह
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेली एकदिवसीय मालिका रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू घरातच होते. त्यामुळे आता आयपीएलच्या निमित्तानं 195 दिवसांनी खेळाडू पुन्हा मैदानावर परतले आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडूही युएइ जाण्याआधी मुंबईत सराव करताना दिसत आहेत. आयपीएलचा 13वा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. युएइमध्ये होणाऱ्या या हंगामासाठी सर्व खेळाडू आणि संघांनी आपला सराव सुरू केला आहे. गतविजेत्या मुंबई संघाकडून यावेळीही चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. युएईमध्ये मुंबई संघाचा रेकॉर्ड फार खराब आहे आणि यंदा ते त्यांच्या खेळात सुधार करू पाहतील. यात रोहितचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या हंगामातील चॅम्पियन संघासाठी रोहित शर्मानं मोलाचं योगदानव दिलं होते. गेल्या हंगामात 15 सामन्यात रोहितनं 28.92च्या सरासरीनं 405 धावा केल्या होत्या. रोहितने आयपीएलच्या 188 सामन्यात 31.60च्या सरासरीनं 4898 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)