Pakistan vs England 1st Test 3rd Day Live Streaming: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमधील पहिला कसोटी सामना रोमहर्षक स्थितीत, तिसऱ्या दिवशीच्या खेळाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? घ्या जाणून
हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team Match Scorecard: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ हा तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबरपासून (सोमवार) मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्याच चेंडूवर नसीम शाहने कर्णधार ओली पोपला बाद केल्याने ग्लँडची सुरुवात निराशाजनक झाली. यानंतर झॅक क्रॉलीने 64 धावांची झटपट खेळी करत इंग्लंडला काहीशा आशा दिल्या. जो रूट (32*) देखील क्रीजवर आहे. तर नसीम शाह यांना केवळ 1 यश मिळाले आहे. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना शान मसूदने 151 धावा केल्या आणि अब्दुल्ला शफीकनेही 102 धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या दिवशी सलमान आगाने देखील शतक झळकवले, (हेही वाचा - PAK vs ENG 1st Test 2024 Day 2 Video Highlights: इंग्लंडने पाकिस्तानला 556 धावांवर रोखले )
पाहा पोस्ट -
Zak Crawley and Joe Root lead the fightback against Pakistan 💪
England end Day 2 on 96-1 after Pakistan scored 556 👏#pakvseng #joeroot #TestCricket pic.twitter.com/sMuEAb1NYE
— Cricbuzz (@cricbuzz) October 8, 2024
सामन्याचे स्थान आणि वेळ
हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. पाकिस्तान संघाची कमान शान मसूदच्या हाती आहे. तर ओली पोप इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून पहिल्या कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2024 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

