Pakistan vs Bangladesh 2nd T20I Match Live Streaming: दुसऱ्या टी20 साठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना; जाणून घ्या थेट सामना ऑनलाईन कुठे पाहू शकता?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 20 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. पाकिस्तान संघाने त्यात वरचढ कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने 17 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, बांगलादेश संघाने फक्त तीन सामने जिंकले आहेत.

Pakistan vs Bangladesh 2nd T20I Match Live Streaming: दुसऱ्या टी20 साठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना; जाणून घ्या थेट सामना ऑनलाईन कुठे पाहू शकता?
Photo Credit- X

Pakistan vs Bangladesh 2nd T20I Match Live Streaming: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (PAK vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा टी-20 सामना आज म्हणजेच 30 मे रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर(Gaddafi Stadium) खेळला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेशचा 37 धावांनी पराभव केला. यासह, पाकिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हाताच्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. या मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आघा करत आहे. तर बांगलादेशचे नेतृत्व लिटन दास करत आहे.

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याची स्थिती

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आणि निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 201 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश संघाला 20 षटकांत 202 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला संपूर्ण बांगलादेश संघ 19.2 षटकांत फक्त 164 धावांवर आटोपला.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळला जाईल?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज म्हणजेच 30 मे रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल.

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-20 सामना कुठे पाहायचा?

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. भारतातील क्रिकेट चाहते सामन्याचे थेट व्हिडिओ स्ट्रीमिंग पाहू शकणार नाहीत.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तान: सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), सैम अयुब, फखर जमान, हसन नवाज, मोहम्मद इरफान खान, खुशदिल शाह, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ, अबरार अहमद.

बांगलादेश: लिटन दास (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांतो, तन्झीद हसन, तौहीद ह्रदोय, महेदी हसन, शमीम हुसेन, जाकेर अली, हसन महमूद, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसेन.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 8462 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).