Mohammad Amir Announces Indefinite Break from International Cricket: 'मानसिक छळ सहन करू शकत नाही', पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित ब्रेकची केली घोषणा

18 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुर्लक्ष करण्यात आलेल्या वेगवान गोलंदाजाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की सध्याच्या पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनात तो खेळू शकत नाही.

मोहम्मद आमिर (Photo by David Rogers/Getty Images)

पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. 18 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी (Pakistan Tour of New Zealand) दुर्लक्ष करण्यात आलेल्या वेगवान गोलंदाजाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की सध्याच्या पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनात (Pakistan Team Management) तो खेळू शकत नाही. अमीरच्या निवृत्तीसंदर्भात (Mohammad Amir Retirement) कोणताही अधिकृत माहिती उपलब्ध नाही आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने ब्रेक घेतल्याचे समजले जात आहे. वर्कलोडच्या मुद्द्यांवरून मोहम्मद अमीरने मागील वर्षी जून 2019 मध्ये कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली होती. न्यूझीलंडमध्ये सुरु होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघातून बाहेर पडणे त्याच्यासाठी ‘वेक अप कॉल’ असल्याचे अमीरने म्हटले. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

“मला वाटत नाही की या व्यवस्थापनाखाली मी क्रिकेट खेळत राहू शकेन. माझा मानसिक छळ होत असल्याने मी सध्या क्रिकेट सोडत आहे. मला असं वाटत नाही की मी यापुढे यातना सहन करू शकतो. माझ्याबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल टीका केली जात आहे. मी एक वैयक्तिक निर्णय घेतला आणि तो अशा चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला, जणू मला माझ्या देशासाठी खेळायचे नाही. कोणाला नाही? कधीकधी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणतात की त्याने (मोहम्मद अमीर) देशाला धोखा दिला. कधीकधी तो माझ्या कामाच्या बोजाविषयी बोलतात, कधीकधी मी योजनांमध्ये नसतो. हे माझ्यासाठी 'वेक-अप कॉल' आहे, मी त्यांच्या योजनांमध्ये नाही आणि मला बाजूला सारले पाहिजे,” सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार आमिरने साम टीव्हीला सांगितले.

आमिरने 2009 मध्ये पाकिस्तानकडून 17 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते 14 कसोटी सामन्यात 15 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवत असताना 2010 लॉर्डस् स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यात दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली. जुलै 2016 मध्ये आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि पाकिस्तान संघासाठी सामना जिंकून देण्याचे काम सुरूच ठेवले. वेगवान गोलंदाजाने एकतर्फी फायनलमध्ये भारताच्या अव्वल फळीला धूळ चारली 2017 पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा आमिर नायक ठरला. अमीरने 36 कसोटी, 61 वनडे आणि 50 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आणि 250 हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif