पाक क्रिकेटपटू हसन अली आज होणार भारताचा जावई, दुबईमध्ये शामिल आरजू सह निकाह आधी केला Pre-Wedding फोटोशूट

दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये दोघांचा निकाह होणार आहे. पण, या निकाह आधी दोघांनी प्री-वेडिंग शूटचे फोटो केला आणि याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांमधील प्रेम स्पष्ट दिसत आहे.

हसन अली आणि शामिया आरजू (Photo Credit: DaArtistPhoto/Instagram)

क्रिकेट विश्वात भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) या दोन प्रतिस्पर्धी देशांमधील सामन्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. या दोन्ही संघातील क्रिकेट मॅचप्रमाणे दोन्ही देशातील प्रेम संबंधांना देखील तितकाच वाव दिला जातो. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने आजकाल न खेळले जावो, पण या दोन्ही देशांकडे आजपण प्रेम संबंध जोडले जातात. पाक क्रिकेटपटू शोएब मालिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हे यांचे उत्तम उदाहरण आहे. आणि आता यांच्यात अजून एक जोडप्याचं नाव जोडलं जाणार आहे. ते म्हणजे हसन अली (Hassan Ali) आणि हरियाणाची निवासी शामिया आरजू. शामिया अलीसोबत आज भारताची शामिया लग्नबंधनात अडकणार आहे. दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये दोघांचा निकाह होणार आहे.

पण, या निकाह आधी दोघांनी प्री-वेडिंग शूटचे फोटो केला आणि याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांमधील प्रेम स्पष्ट दिसत आहे. तिच्या प्री वेडिंग शूटदरम्यान शामिया आरजूने सिल्व्हर कलरचा ड्रेस परिधान केला होता. आणि यात ती खूप सुंदर दिसत होती. पहा हे फोटोज:

सुरुवात

 

सोनेरी क्षण

स्वर्गात बनविलेले बंध!

दरम्यान हसन अली आणि शामिया यांच्या मेहंदीचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. मेहंदी कार्यक्रमानंतर हसनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता ज्यात त्याने बॅचलर म्हणून शेवटची रात्र, असे कॅप्शन दिले होते. याआधी शामियाच्या वडीलांनी मुलीचे लग्न तर करायचे आहे तर मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही असे सांगितले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हसनला लग्नासाठी 6 दिवसांची सुट्टी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif