Wahab Riaz Uses Sliva on Ball: ZIM विरुद्ध वहाब रियाझने कोरोनाचा मोडला नियम, चेंडूवर लाळ लावल्यावर मैदानावर उडाला गोंधळ
यानंतर, मैदानावर गोंधळ उडाला आणि खेळ थोड्यावेळासाठी थांबला. नंतर पंचांनी रियाझला चेंडू जमिनीवर ठेवण्यास सांगितले.
कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात क्रिकेट परतले आहे आणि जगभरातील खेळाच्या उत्साही अनुयायांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर कोविडनंतरच्या काळात बरेच काही बदलले आहे. लाळ बंदीमुळे (Saliva Ban) खेळात एक मोठा बदल झाला आहे ज्यामुळे गोलंदाजांच्या कामावर ताण आला आहे. तथापि, जगभरात कोविड-19 (COVID-19) च्या प्रसंगामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थिती लक्षात घेता अशी बदल होणे काळाची गरज आहे. जरी सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नियम-बदलांचे पालन करीत असले, तरी बहुतेकजण अनेकजण नकळतपणे नवीन नियम विसरतात आणि बॉलवर लाळचा वापर करतात. शनिवारी, 07 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी (Rawalpindi) क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या पाकिस्तान (Pakistan) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टी-20 दरम्यान असेच काहीसे घडले. (अरेरेरे! विराट कोहलीला पडला ICC च्या नियमांचा विसर, चूक लक्षात येताच RCB कर्णधाराने दिली 'अशी' प्रतिक्रिया Watch Video)
पाकिस्तानचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज वहाब रियाजने (Wahab Riaz) नकळत आणि चुकून चेंडूवर लाळ लावली जेव्हा कर्णधार बाबर आझमने झिम्बाब्वेच्या डावातील 11वी ओव्हर टाकण्यासाठी त्याला बोलावले. यानंतर, मैदानावर गोंधळ उडाला आणि खेळ थोड्यावेळासाठी थांबला. नंतर पंचांनी रियाझला चेंडू जमिनीवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर राखीव पंच मैदानावर वाईप्स घेऊन आले त्यानंतर, पंचांनी चेंडू साफ केला.याव्यतिरिक्त, सॅनिटायझरचा वापर करण्यात आला आणि नंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात चेंडूवर लाळचा वापर केल्यावर चेतावणी देण्यात अली होती. वहाबच्या चुकीनंतर पंचांना काही काळ कार्यवाही थांबवावी लागणारा व्हिडिओ येथे पाहा...
आयसीसी खेळात लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांवर कडक आहे. कोविड दरम्यान खेळ सुरु असताना क्षेत्ररक्षकांना पंचांकडून लाळ न वापरण्याचा नियम मोडल्याबद्दल तीन इशारे दिले जातात. चौथ्यांदा याची पुनरावृत्ती केल्यास आता पाच धावांचा दंड ठोठावला जाईल. मालिकेच्या सलामीच्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. Wesley Madhevere च्या 70 धावांच्या जोरावर आफ्रिकेच्या संघाने 6 बाद 156 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात पाकिस्तानने कर्णधार बाबर आझमच्या 82 आणि मोहम्मद हाफिजच्या 36 धावांच्या जोरावर सहा विकेट शिल्लक असताना 18.5 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले.