PAK vs SL: श्रीलंका क्रिकेट संघातील Lasith Malinga, Angelo Mathews सह 'या' खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत घेतली पाकिस्तान दौऱ्यातुन माघार

यामध्ये माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यू, लसिथ मलिंगा यांच्यासह अन्य आठ खेळाडूंचा समावेश आहे

Srilanka Cricket Team (Photo Credits: PTI)

पाकिस्तान (Pakistan)  मधील कराची  (Karachi) येथे 27 सप्टेंबर पासून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यातुन श्रीलंकेच्या (Srilanka Cricket Team) 10 खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत माघार घेतल्याची माहिती आज, 9  सप्टेंबर रोजी श्रीलंका क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार , माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यू (Angelo Mathews), लसिथ मलिंगा  (Lasith Malinga), निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella), कुसल परेरा (Kusal Perera), धनंजय डेसिल्व्हा (Dananjay De Silva), सुरंगा लकमल (Surunga Lakmal), दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal), दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne)आणि Akila Dananjaya या खेळाडूंनी आज आपण पाकिस्तान दौऱ्यात सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

श्रीलंकेचे क्रीडामंत्री हेरिन फर्नांडो दिलेल्या माहितीनुसार, अनेक खेळाडूंच्या कुटुंबियांनी सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावर त्यांना दिलासा देत संघाचे अधिकारी खेळाडूंची भेट घेतील आणि पाकिस्तान दौर्‍यासाठी तेथे त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल, अशी सांगण्यात आले होते. मात्र आज अखेरीस या खेळाडूंनी आपण दौऱ्यात खेळणार नसल्यासाचे स्पष्ट केले आहे.

ANI ट्विट 

खरंतर ही सिरीज म्हणजे कित्येकवर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून वगळण्यात आलेय पाकिस्तनच्या संघाला पुन्हा स्वीकारण्याचा एक मार्ग होता. मात्र 2009 मध्ये लाहोर येथे टेस्ट मॅच नंतर परतत असताना श्रीलंकेच्या संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर खेळाडूंमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तान तर्फे श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या या होम सिरीजच्या तारखांची घोषणा करण्यात आली होती. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर 27 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. यानंतर दोन्ही संघ 5, 7 आणि 9 ऑक्टोबर रोजी लाहोरच्या गधाफी स्टेडियमवर तीन सामन्यांची टी -20 मालिका खेळणार आहेत. यानंतर श्रीलंका देखील डिसेंबरमध्ये दोन सामन्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानचे यजमानपद भूषविणार आहे.