जावेद मियांदाद यांनी केला खुलासा, 1978-79 पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या भारतीय फिरकीपटूंची खूप केली धुलाई

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक जावेद मियांदाद यांना भारत विरुद्ध खेळलेल्या 1978-79 कसोटी मालिकेची आठवण आली. मियांदाद म्हणाले, "चंद्रशेखर, बेदी आणि प्रसन्ना ही भारतीय संघाची शक्ती होती आणि त्यांनी जगभरात चांगली कामगिरी केली, पण जेव्हा ते पाकिस्तानात आले तेव्हा त्यांना बऱ्याच धावा काढल्या."

जावेद मियांदाद (Photo Credit: Twitter)

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक जावेद मियांदाद (Javed Miandad) यांना भारत (India) विरुद्ध खेळलेल्या 1978-79 कसोटी मालिकेची आठवण आली. भारतीय स्पिनर त्रिकुटाविरुद्ध माजी कर्णधार जहीर अब्बास (Zaheer Abbas) यांच्या गोलंदाजीचा संदर्भ घेत मियांदादने या मालिकेचे संस्मरणीय वर्णन केले. या मालिकेत मियांदाद आणि अब्बास यांनी बिशन सिंह बेदी, भागवत चंद्रशेखर आणि इरापल्ली प्रसन्ना या भारतीय फिरकी त्रिकुटाला मात दिली आणि  भरपूर धावा केल्या. अब्बास व मियांदादच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. मियांदाद म्हणाले, "चंद्रशेखर, बेदी आणि प्रसन्ना ही भारतीय संघाची शक्ती होती आणि त्यांनी जगभरात चांगली कामगिरी केली, पण जेव्हा ते पाकिस्तानात आले तेव्हा त्यांना बऱ्याच धावा काढल्या. आमच्या खेळाडूंनी त्यांच्याबरोबर धावांची लूट केली." तो दौरा आठवून पाक खेळाडू नेहमीच खूष असतात. (पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली यांनी केला खुलासा, इमरान खान यांच्यावर जावेद मियांदाद यांना टीममधून बाहेर काढण्याचा केला आरोप)

मियांदादने तो दौरा आठवला आणि भारतीय फिरकी त्रिकूट कसा फ्लॉप झाला ते सांगितले. त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये मियांदादने सांगितले की, जेव्हा 1978-79 मध्ये भारतीय संघ कसोटी खेळायला आला तेव्हा यजमानांनी भारताला 2-0 असे हरवले. जहीर अब्बासला फलंदाजीत कशी मदत केली हेही मियांदादने सांगितले. “मला आठवतंय की चंद्रशेखर जहीरला काही त्रास देत होता. मग त्याने मला सांगितले की ‘जावेद कृपया माझ्यासाठी त्याचा सामना करा’. मी स्पष्टपणे होय म्हणालो. दरम्यान, दुसऱ्या टोकावर झहीर भाई बेदी साहेब आणि प्रसन्नाविरुद्ध बऱ्याच धावा करत होते,” मियांदाद म्हणाले.

मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात जहीर अब्बासने 176 तर मियांदादने 154 धावा केल्या. सामना ड्रॉ झाला. नंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात अब्बासने शानदार डबल शतक झळकावले आणि पाकिस्तानने 8 विकेटने सामना जिंकला. तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटीत जावेदने शानदार शतक झळकावले. पाकिस्तानने तो सामना पुन्हा आठ विकेट्सने विजय मिळवत मालिका 2-0 ने जिंकली. त्या मालिकेत चंद्रशेखरने आठ गडी बाद केले तर बेदी यांना सहा विकेट घेतल्या. मालिकेत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये प्रसन्नाला फक्त दोन विकेट मिळवण्यात यश आले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now