On This Day: सौरव गांगुलीने झळकावले ऐतिहासिक शतक, आजाराला मागे टाकत युवराज सिंह ने 2011 मध्ये वर्ल्ड कप केली पहिल्या शतकाची नोंद

माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि युवराज सिंह, सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी यांनी आजच्याच दिवशी विश्वचषकात ऐतिहासिक शतक ठोकले होते.

सौरव गांगुली आणि युवराज सिंह (Photo Credit: Getty)

आज, 20 मार्च हा आणखी एक खास दिवस आहे, विशेषत: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी. माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि युवराज सिंह (Yuvraj Singh), सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी यांनी आजच्याच दिवशी विश्वचषकात ऐतिहासिक शतक ठोकले होते. गांगुली 20  मार्च, 2003 रोजी विश्वचषकच्या नॉक आऊट सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला, त्याचा सहकारी युवराजने आपल्या आजाराला मागे टाकले आणि 2011 मध्ये पहिले वर्ल्ड कप शतक ठोकले. गांगुलीने 2003 विश्वचषक सामन्यात असा इतिहास रचला होता ज्यास भारतीय फलंदाजाची प्रतिकृती निर्माण होण्यासाठी 12 वर्षे लागली, पण त्यानंतर कोणताही तिसरा भारतीय फलंदाज हा पराक्रम करु शकला नाही. गांगुलीने या दिवशी डरबन येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात केनियाविरुद्ध नाबाद 111 धावा केल्या आणि विश्वचषकातील बाद फेरीत शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

विश्वचषकच्या बाद फेरीतील सामन्यात शतक ठोकणे भारतीय फलंदाजांना अवघड झाले आहे. आजवर खेळल्या गेलेल्या सर्व 12 विश्वचषकांमध्ये भारताने एकूण 13 बाद फेरीतील सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी केवळ दोनच सामन्यात भारतीय फलंदाजाने शतकी कामगिरी केली. विश्वचषकच्या बाद फेरीत खेळताना शतक ठोकणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज आहे. त्याने 2015 वर्ल्ड कपच्या क्वार्टर-फायनल सामन्यात बांग्लादेशविरुद्ध शतक ठोकले होते.

दुसरीकडे, युवराज सिंह आजहीसर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. युवराजने आजच्या दिवसही वर्ल्ड कप 2011 मध्ये आश्चर्यकारक खेळी खेळली होती. 2011 च्या विश्वचषकातील त्याने सर्वोत्तम डाव वेस्ट इंडिजविरुद्ध ग्रुप स्टेज सामन्यात खेळला. सुरुवातीच्या काळात भारताला सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरच्या रूपात दोन झटके लागल्यावर युवराजने विराट कोहलीबरोबर भागीदारी केली.त्याने कोहलीसोबत 122 धावांची भागीदारी केली. त्यांनतर कोहली 59 धावांवर आऊट झाला, पण युवीने त्याचा खेळ सुरूच ठेवला. शिवाय, युवराजच्या चिंतेत भर म्हणजे तो त्या दिवशी आजारी होता. युवीने खेळपट्टीवर बर्‍याच वेळा उलट्या केल्या. या दबावाच्या स्थितीत युवराजने वर्ल्ड कप स्पर्धेत आपले पहिले आणि अखेरचे शतक झळकावले. इतकेच नाही तर या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करीत असताना युवराजनेही गोलंदाजीत चमत्कार केले. त्याने खाते न उघडता धोकादायक फलंदाज आंद्रे रसेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याव्यतिरिक्त, त्याने डेवन थॉमसची विकेटही घेतली. युवराजने 123 चेंडूत 10 चौकारांसह 2 षटकारांच्या मदतीने 91.86 च्या स्ट्राइक रेटने 113 धावा फटकावल्या. दडपणाखाली अशी उल्लेखनीय कामगिरीसाठी युवराजला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.