मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां ने शेअर केला न्यूड फोटो, क्रिकेटरसाठी लिहिलेली पोस्ट पाहून संतप्त फॅन्सनी फटकारले
शनिवारी हसीन जहांने न्यूड फोटोशूट शेअर केला. यासह तिने काही ओळी देखील लिहिल्या, जी वाचल्यानंतर सर्वांना वाटते की ती शमीला टार्गेट करीत आहे.
भारतीय वेगवान गोलंडनज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची पत्नी हसीन जहां (Hasin Jahan) मागील अनेक दिवसांपासून तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून चर्चेचा विषय बनली आहे. शमी आणि हसीन बर्याच दिवसांपासून वाद सुरु आहेत. हसीनने शमीवर घरगुती हिंसाचार, महिलांसोबत अफेयर आणि मॅच फिक्सिंग सारखे गंभीर आरोप केले होते. या वादानंतर हे दोघे स्वतंत्र राहत आहेत. खाजगी आयुष्यातील त्या वादळानंतर शमीची गोलंदाजी अधिक निखळली आहे, तर त्याची पत्नी सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाली. ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. नुकतेच हसीन जहांने असे चित्र शेअर केले असून यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी हसीन जहांने न्यूड फोटोशूट शेअर केला. यासह तिने काही ओळी देखील लिहिल्या, जी वाचल्यानंतर सर्वांना वाटते की ती शमीला टार्गेट करीत आहे. ('Get Ready To Burn'! क्रिकेटर मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां ने इंस्टाग्रामवर शेअर केला Bold व्हिडिओ)
हसीन जहांच्या या फोटोमध्ये शमी सारखा दिसणारा एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो केव्हा आणि कोठे काढला याबद्दल किंवा या फोटोमध्ये शमी आहे की त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी याची पुष्टी अद्याप झालेली नाही. शमीच्या पत्नीची पोस्ट पाहून नेटकरी संतापले आणि त्यांनी तिला फटकार लगावली.
पाहा हसीनचा बोल्ड लुक:
हसीन जहांने शमीला टार्गेट करून एक पोस्ट लिहिली आणि म्हटले,"काल तू काहीज नव्हता तोवर मी पवित्र होते, आज तू यशाचे शिखर चढ़लास तर मी अपवित्र झाले. खोटेपणाचा पडदा पांघरून सत्य किती दिवस लागवणार आहेस. मगरीच्या अश्रूंचा सहारा थोडे दिवसच साथ राहतो."
जहांने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते भडकेल आहेत आणि तिला फटकार लगावली. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
शमी आणि हसीन जहां यांचा वाद सध्या न्यायालयात आहे. लॉकडाउन दरम्यान शमीने रोहित शर्माला इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट सेशन दरम्यान सांगितले की जेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता तेव्हा तो नैराश्यात गेला होता. त्यावेळी अनेक वेळा आत्महत्येची कल्पनाही त्याला आली असल्याने त्याने म्हटले.