Oman vs Nepal 5th T20 2024 Live Streaming: पाचव्या टी 20 मध्ये ओमान आणि नेपाळ यांच्यात होणार रोमांचक सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून

दोन्ही संघांमधील हा सामना किंग सिटीतील मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राऊंडवर खेळवला जाईल.

(Photo: @TheOmanCricket/@CricketNep)

Oman National Cricket Team vs Nepal National Cricket Team 5th T20 Tri-Series 2024 Live Streaming: ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील टी20 तिरंगी मालिका 2024 चा पाचवा सामना आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना किंग सिटीतील मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राऊंडवर खेळवला जाईल. तिरंगी मालिकेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. ओमानने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाला विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, नेपाळने तिरंगी मालिकेत 3 सामने खेळले आहेत. शेवटच्या सामन्यात नेपाळने विजय मिळवला होता. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. (हेही वाचा:Oman vs Nepal 2nd T20 2024 Scorecard: नेपाळचा ओमानवर 37 धावांनी विजय, गुलसन झा ठरला सामन्याचा हिरो )

ओमान विरुद्ध नेपाळ यांच्यातील पाचवा टी 20 सामना किती वाजता सुरू होईल?

ओमान आणि नेपाळ यांच्यातील पाचवा टी 20 सामना 1 ऑक्टोबर रोजी किंग सिटीमधील मॅपल लीफ नॉर्थ-वेस्ट मैदानावर खेळवला जाईल. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल.

थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल

पाचव्या टी-२० सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगबाबत कोणतीही माहिती नाही. सामने टेलिव्हिजनवर प्रसारित केले जाणार नाहीत. कॅनडामध्ये तुम्ही स्लिंग टीव्ही - विलो टीव्हीवर स्ट्रीमिंग करून सामना थेट पाहू शकतात. अशी अपेक्षा आहे की फॅनकोड ॲप त्याचे स्ट्रीमिंग प्रदान करेल परंतु कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

दोन्ही संघांचे खेळाडू

नेपाळ संघ : अनिल शाह, आरिफ शेख, रोहित पौडेल (कर्णधार), कुशल मल्ला, कुशल भुर्तेल, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, सोमपाल कामी, आसिफ शेख, भीम शार्के, देव. खनाल, अर्जुन सौद, रिजन ढकल

ओमान संघ : आकिब इलियास (कर्णधार), कश्यप प्रजापती, शोएब खान, झीशान मकसूद, अयान खान, खालिद कैल, प्रतीक आठवले, फैयाज बट, कलीमुल्ला, रफिउल्ला, शकील अहमद, जय ओडेदरा, समय श्रीवास्तव, मुझाहीर राणा, मुझाहीर राणा सिद्धार्थ, मेहरान खान, जतिंदर सिंग