NZ vs PAK T20I Squad: पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर; केन विल्यम्सनचे कमबॅक, तर रॉस टेलरला वगळले

दौऱ्याला सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मालिकेसाठी किवी संघ जाहीर झाला आहे. अनुभवी फलंदाज रॉस टेलरला पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेतून वगळण्यात आलं तर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी विश्रांती मिळालेल्या केन विल्यमसन आणि ट्रेंट बोल्ड यांचं संघात कमबॅक झालं आहे.

केन विल्यमसन (Photo Credit: Twitter/ICC)

NZ vs PAK T20I Squad: न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात 18 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दौऱ्याला सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मालिकेसाठी किवी संघ जाहीर झाला आहे. अनुभवी फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेतून वगळण्यात आलं तर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी विश्रांती मिळालेल्या केन विल्यमसन (Kane Williamson) आणि ट्रेंट बोल्ड (Trent Boult_ यांचं संघात कमबॅक झालं आहे. डेव्हन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या फॉर्ममध्ये असल्याने टेलरला वगळण्यात आल्याची माहिती निवड समितीचे गॅव्हिन लार्सन यांनी शनिवारी एका निवेदनात दिली. विल्यमसनचा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी समावेश झाला आहे. यापूर्वी विल्यम्सनने आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या निमित्ताने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याचे ठरवले होते. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत ऑकलंडमध्ये 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात मिचेल सॅटनर पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल. (ICC T20I Rankings: विराट कोहली, केएल राहुलला टी-20 क्रमवारीत फायदा, अ‍ॅडम झांपाची टॉप-5 मध्ये एंट्री, पाहा लेटेस्ट रँकिंग)

विल्यमसन 20 डिसेंबर रोजी हॅमिल्टन व नेपियर येथे 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या अन्य दोन सामन्यांसाठी संभाव्य पुनरागमन करेल. वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसन आणि हमीश बेनेट यांनाही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर केले गेले आहे तर Jacob Duffy याला पहिल्यांदा राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. स्कॅनमधून असे दिसून आले की फर्ग्युसनला पाठीवर स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टनमधील दुसर्‍या कसोटी सामन्यात सध्या सहभागी असलेला कोणताही खेळाडू पहिल्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही.

न्यूझीलंड टी -20 संघः

पहिला सामना - मिचेल सॅटनर (कॅप्टन), टॉड एस्टल, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुगलेइजन, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ईश सोधी आणि ब्लेअर टिकनर.

दुसरा आणि तिसरा सामना - केन विल्यमसन (कॅप्टन), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, डेव्हन कॉनवे, मार्टिन गप्टिल, काईल जेमीसन, स्कॉट कुगलेइजन, डॅरेल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी.