NZ vs PAK 1st T20I Live Streaming Details: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना लाईव्ह TV टेलिकास्ट पाहा PTV Sports वर

मालिकेतील पहिला सामना आज ऑकलँडच्या ईडन पार्क येथे खेळला जाणार आहे. भारतीय चाहत्यांना या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर पाहता येणार नाही. पाकिस्तानमध्ये PTV Sports टीव्ही चॅनेलवर विनामूल्य टेलिकास्ट पाहता येईल.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: Getty Images)

NZ vs PAK 1st T20I Live Streaming: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेनंतर न्यूझीलंड (New Zeland) संघ पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आता 3 सामन्यांची टी-20 मालिका आयोजित करण्यास सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना आज ऑकलँडच्या (Auckland) ईडन पार्क (Eden Park) येथे खेळला जाणार आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे पाच टी-20 सामन्यात पाकिस्तानने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. दरम्यान, न्यूझीलंड-पाकिस्तानमधील पहिला टी-20 सामना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7:00 वाजता आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता सुरू होईल. दुर्दैवाने, भारतीय चाहत्यांना या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर पाहता येणार नाही. पाकिस्तानमध्ये PTV Sports टीव्ही चॅनेलवर विनामूल्य टेलिकास्ट पाहता येईल. शिवाय चाहत्यांना फॅनकोड मोबाइल अ‍ॅपवर विनामूल्य लाइव्ह स्कोअर अपडेट मिळू शकते. तथापि, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामना लाईव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी यूजर्सना नाममात्र शुल्क भरावे लागेल. यूजर्सना मॅच पाससाठी 19 रुपये किंवा पाकिस्तान-न्यूझीलंड सीरीज 2020 पाससाठी 49 रुपये द्यावे लागतील.

पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझमला दुखापत झाल्याने त्याच्या जागी शादाब खानला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आझमला सरावादरम्यान दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकावे लागणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पितृत्व रजेवर असल्याने मिचेल सॅटनर संघाचे नेतृत्व करत आहे. न्यूझीलंडसाठी जेकब डफीने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

न्यूझीलंड संघ: मार्टिन गप्टिल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, डेव्हन कॉनवे, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिशेल सॅटनर (कॅप्टन), डग ब्रेसवेल, स्कॉट कुगेलेइझन, जेकब डफी, ईश सोधी, टॉड एस्टल आणि ब्लेयर टिकर.

पाकिस्तान संघ: मोहम्मद हाफिज, हैदर अली, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), शादाब खान (कॅप्टन), इमाद वसीम, फहीम अशरफ, वहाब रियाज, शाहीन आफ्रिदी, हरीस रऊफ, अब्दुल्ला शफीक, हुसेन तलत, मोहम्मद हसनैन आणि सरफराज अहमद.