ICC World Cup 2023 New Schedule Released: आता 14 ऑक्टोबरला रंगणार टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातला हाय व्होल्टेज सामना, 'या' सामन्यांच्याही वेळापत्रकात बदलेल

आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार आता इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना आता 10 ऑक्टोबरला होणार आहे.

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

आगामी विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. याआधी हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता, मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला. टीम इंडिया आणि पाकिस्तान मॅचशिवाय 8 मॅचेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार आता इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही सामने एकाच दिवशी होणार आहेत. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. तर पाकिस्तान आणि श्रीलंका दुपारी 2 वाजता सुरू होतील.

याशिवाय 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रंगणार आहे. तर 13 ऑक्टोबरला न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. (हे देखील वाचा: IND vs PAK, Asian Champions Trophy 2023 Live Streaming: आज होणार भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, एका किल्कवर जाणून घ्या घरबसल्या कधी - कुठे पाहणार सामना)

न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सामना होणार आहे.

याशिवाय आता ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात 11 नोव्हेंबरला सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 पासून खेळवला जाईल. 11 नोव्हेंबरलाच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. 11 नोव्हेंबरलाही दोन सामने होणार आहेत. त्याचवेळी 12 नोव्हेंबरला टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होणार आहे.