Virat Kohli चं नाही ‘हे’ भारतीय दिग्गज देखील कर्णधार म्हणून नाही उंचावू शकते आयपीएल ट्रॉफी, यादीत चकित करणारी नावे

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात अंतिम वेळी खेळण्यास मैदानात उतरला. यामुळे कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे विराटचे स्वप्न अपूर्ण राहिले. बरं उल्लेखनीय म्हणजे तो एकटा नाही, पण अनेक भारतीय दिग्गजांची कारकीर्द या निराशेने संपुष्टात आली आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात अंतिम वेळी खेळण्यास मैदानात उतरला. यूएईमध्ये (UAE) हंगामाच्या दुसऱ्या लेगपूर्वीच कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या क्वालिफायर्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला बाहेर पडावे लागले. यामुळे कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे विराटचे स्वप्न अपूर्ण राहिले. बरं उल्लेखनीय म्हणजे तो एकटा नाही, पण अनेक भारतीय दिग्गजांची कारकीर्द या निराशेने संपुष्टात आली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) सारख्या भारतीय दिग्गजांना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत आयपीएल फ्रँचायझी टीमसाठी ट्रॉफी जिंकता आली नव्हती. (IPL 2021: ‘निराशाजनक शेवट, पण...’; पराभवानंतर विराट कोहलीने लिहिला खास संदेश, RCB टीमसाठी केले मोठे भाष्य)

तथापि विराट कोहलीचे नाव या यादीत सर्वात आघाडीवर येते कारण त्याला अनेक वर्षे आरसीबीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. फ्रँचायझी संघाने 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली होती पण दोन्ही वेळी त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. बराच काळ त्याच्यावर विश्वास ठेवला होता, तो एक खेळाडू म्हणून यशस्वी झाला पण तो संघाला एकदाही जेतेपद जिंकवून देऊ शकला नाही. एकूण 140 सामन्यांमध्ये आरसीबी संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळूनही विराटची कर्णधारपदाची कारकीर्द निराशेने संपली. विराटनंतर अनुभवी वीरेंद्र सेहवागचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. दिल्लीकडून खेळणाऱ्या या सलामी फलंदाजाने 52 सामन्यांमध्ये दिल्लीचे कर्णधारपद भूषवले पण संघाला ट्रॉफी मिळवता आली नाही. यानंतर महान सचिन तेंडुलकरचे नाव यादीत आहे. त्याने 51 सामन्यांत मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद म्हणून नेतृत्व केले पण एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाही.

याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल द्रविडचे आयपीएल कर्णधारपदही ट्रॉफीशिवाय संपुष्टात आले. त्याने एकूण 48 सामन्यांमध्ये (34 राजस्थान रॉयल्स आणि 14 रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) कर्णधारपद भूषवले. तसेच भारतीय संघाचा आणि कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार सौरव गांगुली देखील या यादीत सामील आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement