IPL 2019 चा उद्घाटन सोहळा रद्द; पुलवामा हल्ल्यातील शहीद कुटुंबांना दान करणार रक्कम- BCCI

इंडियन प्रिमियर लीगचा (Indian Premier League) चा 12 वा सिजन 23 मार्चपासून सुरु होणार आहे.

Representational Image |(Photo Credit-Facebook)

IPL 12: इंडियन प्रिमियर लीगचा (Indian Premier League) चा 12 वा सिजन 23 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल 2019 मध्ये 23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान एकूण 17 सामने रंगणार आहेत. पण यंदा आयपीएलचा उद्घाटन समारंभ होणार नाही. उद्घाटन समारंभासाठी लागणारी रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे चीफ विनोद राय (Vinod Rai) यांनी दिली आहे. पहिल्या दोन आठवड्याचं वेळापत्रक जाहीर; 23 मार्चला IPL 12 चा पहिला सामना CSK विरुद्ध RCB चैन्नई मध्ये रंगणार

14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला. आजही एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. असे जरी असले तरी पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत.  त्यात आता BCCI ने घेतला हा निर्णय अतिशय स्तुत्य आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif