T20 World Cup 2024 Live Streaming: फॅनकोड किंवा सोनी लिव्ह नाही, येथे पाहू शकता तुम्ही संपूर्ण टी-20 विश्वचषक 'विनामूल्य'
टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या (IND vs IRE) सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.
T20 World Cup 2024 Live Streaming: आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2024) स्पर्धेची नववी आवृत्ती 1 जूनपासून होणार आहे. स्पर्धेचे सामने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवले जातील. या मेगा टूर्नामेंटमध्ये प्रथमच 20 संघ सहभागी होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 खेळण्यासाठी (T20 World Cup 2024) अमेरिकेत पोहोचला आहे. टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या (IND vs IRE) सामन्याने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. याआधी संघाचा एकमेव सराव सामना 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. टीम इंडिया 17 वर्षांपासून टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीची वाट पाहत आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 ट्रॉफी जिंकली होती.
कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग?
आयसीसीच्या या मेगा टूर्नामेंटच्या सामन्यांचा क्रिकेट चाहत्यांना मोफत आनंद घेता येणार आहे. यासाठी त्यांना पैसे खर्च करण्याची गरज नाही. Disney Plus Hotstar ने जाहीर केले आहे की ते टी-20 विश्वचषक सामने त्यांच्या ॲपवर विनामूल्य दाखवतील. मोबाइल वापरकर्ते त्यांच्या मोबाइलमध्ये हे ॲप मोफत डाउनलोड करून वर्ल्ड कपचा थेट आनंद घेऊ शकतात. तुम्ही टी-20 विश्वचषक 2024 चे सामने फक्त मोबाईलवर मोफत पाहू शकाल. याशिवाय, जर तुम्हाला ते लॅपटॉप किंवा टीव्ही सारख्या इतर कोणत्याही डिव्हाइसवर पहायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील.
भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार
भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून त्यात आयर्लंड, यजमान अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात रोहित आणि कंपनीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. तिसऱ्या गटातील सामन्यात भारताचा सामना यजमान अमेरिकेशी होणार आहे. टीम इंडिया 15 जूनला कॅनडाविरुद्ध चौथा सामना खेळणार आहे. भारतीय संघाची गटसाखळीत पाकिस्तानशी कडवी टक्कर होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाचा पाकिस्तानशी 7 वेळा सामना झाला आहे, जिथे त्यांना फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे.
हे देखील वाचा: Rishabh Pant In Team India Jersey: ICC T20 विश्वचषक 2024आधी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला पंत, चाहत्यांना आनंद
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचे वेळापत्रक
भारत विरुद्ध आयर्लंड- 05 जून, न्यूयॉर्क
भारत विरुद्ध पाकिस्तान- 09 जून, न्यूयॉर्क
भारत विरुद्ध अमेरिका- 12 जून, न्यूयॉर्क
भारत विरुद्ध कॅनडा- 15 जून, फ्लोरिडा
20 संघांची 5-5 गटात विभागणी करण्यात आली आहे
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होत आहेत. पाच संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. यानंतर आठही संघ प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागले जातील. सुपर 8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ दोन उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश करतील.