New Zealand vs Sri Lanka 3rd ODI 2024-25 Live Score Update: तीन विकेट गमावून श्रीलंकेची धावसंख्या 32 षटकांत 176 ; येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 11 जानेवारी रोजी खेळला जात आहे. नाणेफेक जिंकूण श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 3rd ODI Match 2025: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 11 जानेवारी रोजी खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असलंका करत आहे. येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड
नाणेफेक जिंकूण श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची धाव संख्या सध्या 176/3 (32 षटकांत) आहे. अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस हे बाद झाले आहेत. नॅथन स्मिथच्या गोलंदाजीवर अविष्का फर्नांडो हा झेल बाद झाला. मार्क चॅपमने त्याचा झेल घेतला. त्याने 33 चेंडूत 17 धावा केल्या. तर, कुसल मेंडिस 48 चेंडूत 54 धावाकरून बाद झाला.मिचेल सँटनरच्या गोलमदाजीवर तो बाद झाला. मायकेल ब्रेसवेलने त्याचा झेल झेलला. तर चरिथ असलंका खाते न खेलताच शून्यावर बाद झाला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 255 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण श्रीलंकेचा संघ 30.2 षटकांत केवळ 142 धावांवर आटोपला. श्रीलंकेविरुद्ध नुकतीच टी-20 मालिका जिंकल्यानंतर, न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेतही त्यांची लय कायम ठेवायची आहे. न्यूझीलंड संघाची अलिकडची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सरासरी असली तरी, घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी नेहमीच चांगली असते.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड: विल यंग, मार्क चॅपमन, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर (कर्णधार), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), जेकब डफी, मॅट हेन्री, विल ओ'रोर्क, नॅथन स्मिथ/मायकेल ब्रेसवेल.
श्रीलंका: पथुम निस्सांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरिथ असलंका (कर्णधार), कामिंदु मेंडिस, दुनिथ वेलागे, वानिंदु हसरंगा, जेफ्री वँडरसे, असिता फर्नांडो, लाहिरु कुमारा, जानिथ लियानागे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2025 08:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

