New Zealand vs Pakistan 5th T20 2025 Live Streaming: पाचव्या टी 20 साठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने; लाईव्ह सामना भारतात पाहता येईल? जाणून घ्या
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाचवा टी-20 सामना 26 मार्च रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता वेलिंग्टनमधील बे ओव्हल (स्काय स्टेडियम) येथे खेळला जाईल.
New Zealand National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 5th T20I Match 2025 Live Streaming: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand vs Pakistan ) यांच्यातील पाचवा टी 20 सामना 26 मार्च रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता वेलिंग्टनमधील (Wellington) बे ओव्हल (स्काय स्टेडियम) (Sky Stadium) येथे खेळला जाईल. चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 115 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली. आता पाचव्या सामन्यात किवी संघ पाकिस्तानला हरवून मालिका 4-1 अशी जिंकण्यावर लक्ष केंद्रित करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाचवा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाचवा टी-20 सामना 26 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता बे ओव्हल, वेलिंग्टन येथे खेळला जाईल. या सामन्याचा नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
न्यूझीलंड आणि पाकिस्तानमधील 5वा टी 20 सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता?
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाचवा टी-20 सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड: टिम सेफर्ट, फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), काइल जेमीसन, जेकब डफी, ईश सोधी, बेन सीयर्स.
पाकिस्तान: मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), हसन नवाज, सलमान आगा (कर्णधार), इरफान खान, खुशदिल शाह, शादाब खान, अब्दुल समद, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, अब्रार अहमद, हरिस रौफ.
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2025 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

