New Zealand vs England 1st Test 2024 Live Streaming: न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात उद्यापासून रंगणार कसोटीचा सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

उभय संघांमधील हा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी त्यांचे प्लेइंग 11 जाहीर केले आहेत.

Photo Credit- x

New Zealand National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Live Streaming: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 28 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी त्यांचे प्लेइंग 11 जाहीर केले आहेत. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडची कमान टॉम लॅथमच्या खांद्यावर आहे. तर केन विल्यमसन दुखापतीनंतर परतला आहे, याशिवाय डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेलसह अनेक अनुभवी खेळाडू प्लेइंग 11 चा भाग आहेत. इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे असेल. याशिवाय जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप यांसारखे स्टार खेळाडू खेळणाऱ्या संघाचा भाग आहेत.

न्यूझीलंड संघ नुकताच भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 3-0 ने पराभूत करून इंग्लंडसोबत खेळणार आहे. अशा स्थितीत संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडणार असून पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभूत करून मालिकेत आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-1 ने गमावल्यानंतर इंग्लंड संघ येत आहे. अशा स्थितीत किवी संघाला त्यांच्याच घरात कडवे आव्हान द्यायला इंग्लंडला आवडेल.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी: 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च

दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, सेडन पार्क, हॅमिल्टन

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस कधी खेळला जाईल?

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल.

सामना कुठे पहाल?

भारतात टीव्हीवर न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघातील खेळाडू

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साऊदी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के.

इंग्लंडः झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.