New Zealand Beat Sri Lanka, 1st T20I Match Full Highlights: न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा 8 धावांनी पराभव; फलंदाजांनंतर गोलंदाजांचा धुमाकूळ; पहा सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स

81 चेंडूत 121 धावांची भागीदारी करताना श्रीलंकेची पहिली विकेट गेली. श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 164 धावा करू शकला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकाने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली.

Photo Credit- X

New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 1st T20I Match Video Highlights: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 (NZ vs SL 1st T20I)मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी खेळला गेला. उभय संघांमधला हा सामना माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे. (हेही वाचा:NZ vs SL 1st T20I 2024 Toss Update: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11)

सामन्याचे हायलाइट्स पहा:

पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 39 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 172 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 62 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान डॅरिल मिशेलने 42 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. डेरिल मिशेलशिवाय मायकेल ब्रेसवेलने 59 धावा केल्या.

दुसरीकडे, बिनरा फर्नांडोने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून बिनुरा फर्नांडो, महेश थेक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. बिनुरा फर्नांडो, महेश थेक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांच्याशिवाय मथिशा पाथिरानाने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 20 षटकात 173 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात स्फोटक झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी अवघ्या 81 चेंडूत 121 धावांची झटपट भागीदारी केली. श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 164 धावा करू शकला. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकाने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान पथुम निसांकाने 60 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. पथुम निसांकाशिवाय कुसल मेंडिसने 46 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही फलंदाजाला धावा करण्यात यश आले नाही.



संबंधित बातम्या