Hardik Pandya याला Natasa Stankovic हिने स्विमिंग पूलमध्येच केले किस; पाहा फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज खेळाडू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती वेळोवेळी तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संपर्क साधत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे.

Hardik Pandya याला Natasa Stankovic हिने स्विमिंग पूलमध्येच केले किस; पाहा फोटो
Hardik Pandya And Natasa Stankovic (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज खेळाडू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती वेळोवेळी तिच्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संपर्क साधत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. नताशा स्टॅनकोविचने नुकताच इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नताशा हार्दिकचे स्विमिंग पूलमध्येच चुबंन घेत आहेत. तसेच या फोटोला नताशाने 'माय सनसाईन हार्दिक पांड्या',असे कॅप्शन दिले आहे. नशाताने शेअर केलेल्या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. या फोटोमधील दोघांची रोमँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना विशेष भावली आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक हे सुप्रसिद्ध जोडपे आहे. ते नेहमीच त्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसह शेअर करत असतात. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने गेल्या वर्षीच मुलाला जन्म दिला आहे. या दोघांनी आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे. हे देखील वाचा- IND vs ENG 2nd ODI 2021: जॉनी बेअरस्टोने मोडला ‘विराट’ रेकॉर्ड, कुलदीप यादव ठरला महागडा, दुसऱ्या वनडे सामन्यात पडला विक्रमांचा पाऊस

नताशा स्टॅनकोव्हिकची इंस्टाग्राम पोस्ट-

हार्दिक पांड्याला आक्रमक खेळाडू म्हणून ओळखले जाते. पुण्याच्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने केवळ 16 चेंडूत 35 धावा ठोकल्या होत्या. मात्र, दुर्देवाने या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजयी मिळवणारा संघ एकदिवसीय मालिका खिश्यात घालणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2021 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).