Mzansi Super League: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' गोलंदाजाने दोन्ही हातांनी आश्चर्यचकित गोलंदाजी करत घेतल्या विकेट्स, पाहा Video

ग्रेगरीने या लीगदरम्यान दोन्ही हाताने गोलंदाजी केली आणि दोन विकेटदेखील मिळवल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

ग्रेगरी माहलोकवाना (Photo Credits: Twitter/Mzansi Super League)

क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. विशेषत: जर तुम्ही टी-20 क्रिकेटबद्दल बोलत असाल तर गोलंदाजासाठी जास्त काही करण्यासारखे नसते. फलंदाज मोठे शॉट्स मारत असतो आणि गोलंदाज फक्त बघत असतो. फलंदाजाने चूक केल्यास तो बाद होईल. क्रिकेटमध्ये लोकांना फलंदाजी बघायची असते. पण, अशा परिस्थितीत एक गोलंदाज सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तो एक अद्वितीय गोलंदाज आहे. वास्तविक गोलंदाज एकतर डाव्या हाताने किंवा डाव्या हाताने चेंडू फेकतो. मात्र, आपण कधीही कोणत्या गोलंदाजाला दोन्ही हातांनी चेंडू टाकताना पाहिले आहे का? पण हा गोलंदाज आश्चरचकित करत दोन्ही हाताने गोलंदाजी करतो. या गोलंदाजाने केवळ दोन्ही हातांनी गोलंदाजीचं नाही केली तर त्या दोन प्रकारे टाकलेल्या बॉलवर विकेटही घेतल्या. हा गोलंदाज त्याच्या आश्चरकारक शैलीसाठी अचानक चर्चेत आला आहे.

हा आश्चर्यकारक गोलंदाज म्हणजे ग्रेगरी माहलोकवाना (Gregory Mahlokwana). दक्षिण आफ्रिकामध्ये सध्या सुरु असलेल्या मझांसी सुपर लीग (Mzansi Super League) मध्ये तो खेळत आहेत आणि आपल्या गोलंदाजीद्वारे त्याने  लक्ष वेधले. ग्रेगरीने या लीगदरम्यान दोन्ही हाताने गोलंदाजी केली आणि दोन विकेटदेखील मिळवल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. मझांसी सुपर लीगने त्याच्या ट्विटर अकाउंटवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्यात ग्रेगरीला 8 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मिळाली, त्यावेळी त्याने उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने सरेल एर्वी (Sarel Erwee) याला बाद केले. त्यानंतर त्याने डावाच्या 10 व्या षटकात डर्बन हीटचा कर्णधार डॅन विलास (Dane Vilas) याला बोल्ड केले. पाहा या गोलंदाजाच्या या आश्चर्यकारक कामगिरीचा हा व्हिडिओ:

याआधीही, जागतिक क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक गोलंदाज आहेत जे आपल्या वेगळ्या गोलंदाजी शैलीसाठी परिचित आहेत. यात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, पॉल एडम्स, जसप्रीत बुमराह यासारख्या अन्य गोलंदाजांचा समावेश आहेत.