दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2000 मुंबई टेस्ट, कोचीन वनडे सामने फिक्स, दिल्ली पोलिसांचा चकित करणारा खुलासा
क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बूकी संजीव चावला याचे प्रत्यार्पण केल्यानंतर दिल्ली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. खटल्या अंतर्गत चावलाविरुद्ध नवीन आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे ज्यात त्याने 2000 मध्ये मुंबई येथील पहिला कसोटी सामना आणि कोचीन येथे पहिला वनडे सामना फिक्स असल्याचे धक्कादायक खुलासा केला आहे.
क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बूकी संजीव चावला (Sanjeev Chawla) याचे प्रत्यार्पण केल्यानंतर दिल्ली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. चावलावर मॅच फिक्सिंग (Match Fixing) रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) याबाबत 2000 मध्ये याबाबत उघड करण्यात आले होते. या खटल्या अंतर्गत चावलाविरुद्ध नवीन आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे ज्यात त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. जगाला हादरवून टाकणाऱ्या 'त्या' मॅच फिक्सिंग प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोन्जे (Hansie Cronje) याचाही समावेश होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लांबलचक प्रक्रियेनंतर चावला या ब्रिटिश नागरिकाचे प्रत्यार्पण करण्यात आले होते, परंतु हायकोर्टाच्या स्थगिती आदेशाच्या अनुपस्थितीत चावला तिहाड कारागृहातून बाहेर ठेवण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार 13 मे रोजी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. (IND Tour Of SA 2020: टीम इंडियाच्या ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत कोणतीही वचनबद्धता नाही, BCCI ने फेटाळला CSA चा दावा)
दरम्यान दिल्ली पोलिसांच्या आरोप पत्रात, तपासणी दरम्यान नोंदविलेल्या साक्षीदारांच्या विधानांच्या आधारे, जप्त केलेल्या ऑडिओ आणि व्हिडीओ कॅसेटमधील आरोपींमधील संभाषण, सीएफएसएल अहवाल आणि इतर माहितीपट व तोंडी पुरावा यांच्या आधारे, काही सामने फिक्स झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, असे नमुद करण्यात आले आहे. यामध्ये 2000 मध्ये मुंबई (Mumbai) येथील पहिला कसोटी सामना आणि कोचीन (Cochin) येथे पहिला वनडे सामना फिक्स करण्यात आला होता. आरोपीविरोधात कलम 420 आणि 120 बी नुसार दंडनीय गुन्हे दाख करण्यात आल्याचेही आरोपपत्रात म्हटलं आहे.
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले हे 68 साक्षीदारांच्या यादीतील सर्वात मोठे नाव होते. या प्रकरणा दरम्यान ते बीसीसीआयचा पदभार सांभाळत होते. त्यांचे 2013 मध्ये निधन झाले. 2000 मध्ये आफ्रिका संघाने भारत दौरा केला होता, ज्यात चावला आणि क्रोन्जेच्या मदतीने दौर्यादरम्यान मॅच फिक्सिंग करण्यात आली होती. त्यानंतर मालिकेत 5 वनडे सामने खेळले गेले. आरोपपत्रात मुंबई टेस्ट आणि कोचीन वनडे निश्चित असल्याचे नमूद केले आहे. “… काही सामने फिक्स झाले होते तर काही सामने फिक्स करण्याचा प्रयत्न केला गेला.”
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)