IPL 2020 Full Time Table: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा घडणार काहीतरी नवीन, पूर्ण शेड्यूल जाणून घ्या
हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. 57 दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 24 मे रोजी होईल.
गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या पहिल्या सामन्यात, 29 मार्च रोजी मागील सत्रातील उपविजेते चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना करेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 लीगच्या ताज्या हंगामाच्या वेळापत्रकांची पुष्टी केली असून, इतिहासात प्रथमच दुपारचे फक्त सहा सामने होणार आहेत. पारंपारिकपणे, आयपीएल (IPL) च्या प्रत्येक आठवड्याच्या शेवटी डबल-हेडर खेळवण्यात यायचे जे भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता सुरु व्हायचे. देशातील ब्रॉडकास्टरच्या मागणीनंतर दुपारचे खेळ पूर्णपणे काढून टाकले जातील असा अंदाज वर्तविला जात होता पण आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याऐवजी अशा प्रकारच्या सामन्यांची संख्या कमी करून केवळ सहावर खेळवण्याचा निर्णय घेतला. 57 दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 24 मे रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाची घरच्या मैदानावरील वनडे मालिका 18 मार्च रोजी कोलकाता येथे संपुष्टात येणार असून त्यानंतर 11 दिवसांनी फ्रँचायझी स्पर्धा सुरू होईल. (आयपीएलचे पूर्ण शेड्युल पाहण्यासाठी येथे क्लीक करा)
बदलावाबद्दल बोलले तर यावेळी आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही. उदघाटन सोहळ्यात तब्बल 30 करोड रुपयांचा खर्च होत असल्याने, मागील वर्षी ही रक्कम पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांना देण्यात आली होती. या वेळीही ओपनिंग सेरेमनी होणार नाही. औपचारिक सलामीनंतरपहिला सामना लगेचच सुरू होईल. शिवाय, या वेळी सहा डबल हेडर सामने होणार आहेत, जे फक्त रविवारी खेळले जातील. म्हणजे शनिवारी एकच सामना होईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पहिला सामना होणार असून प्ले ऑफ आणि फायनलचे ठिकाण अद्याप जाहीर केले नाहीत.
यंदा आयपीएलमध्ये कनकशनचा नियमही लागू केला आहे. यावेळी पहिल्यांदा थर्ड अंपायर नोबोलचा निर्णय घेतील. आजवर नो बॉलचा निर्णय मैदानावरील अंपायर घ्यायचे. मागील वर्षी नो बॉलच्या संबंधित खराब निर्णयामुळे अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले होते ज्यामुळे वाद निर्माण झाले होते.