IPL 2023 Playoff Scenario: प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स आपले स्थान करू शकते निश्चित, जाणून घ्या उर्वरित तीन संघांचे संपूर्ण समीकरण

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 5 गड्यांच्या मोबदल्यात 218 धावा केल्या.

IPL 2023 (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील 57 वा सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा 27 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 5 गड्यांच्या मोबदल्यात 218 धावा केल्या. विजयासाठी दिलेल्या 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावाच करू शकला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शानदार विजयानंतर मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या दिशेने आपली वाटचाल आणखी मजबूत केली आहे. आता मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई इंडियन्सच्या या विजयामुळे काही संघांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

मुंबईचे प्ले ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित 

आयपीएलच्या 16व्या मोसमात मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई इंडियन्सने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास ते 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील. सध्या मुंबई इंडियन्सचे 14 गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सने 2 पैकी एकही सामना गमावला तरी त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सने 12 सामने खेळले असून त्यापैकी 7 जिंकले आहेत आणि 5 पराभव पत्करले आहेत. (हे देखील वाचा: MS Dhoni Sixes Record: आयपीएलच्या इतिहासात एमएस धोनीच्या नावावर नोंदला आहे हा अनोखा विक्रम, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क)

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी सोपा मार्ग

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएलच्या 16व्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हे दोन्ही संघ अंतिम चारमध्ये पोहोचण्याचीही खात्री आहे. गुजरात टायटन्सचे अजून 2 सामने बाकी आहेत. अशा स्थितीत गुजरातने एकही सामना जिंकल्यास ते प्लेऑफसाठी सहज पात्र ठरेल. दुसरीकडे, गुजरातने दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले तर 20 गुणांसह त्याचा प्रवास संपेल. सध्या गुजरातचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे एमएस धोनीच्या टीम सीएसकेचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनीच्या संघाला अजून 2 सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत तो अंतिम चारमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे.

लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत

या मोसमात गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण चौथ्या क्रमांकावर कोणता संघ असेल, यासाठी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत आहे. आयपीएलच्या या मोसमात लखनौ सुपर जायंट्स संघाने 11 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 5 जिंकले आहेत आणि 5 पराभव पत्करले आहेत. 11 गुणांसह लखनौचा संघ पाचव्या स्थानावर कायम आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाला अजून तीन सामने खेळायचे आहेत. लखनौने उर्वरित सामने जिंकले तर त्याचे 17 गुण होतील. अशा स्थितीत त्याचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा होईल. पण एक सामना हरल्याबरोबर लखनौचे संपूर्ण समीकरण बिघडेल. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्ससाठी ही करा किंवा मरो अशी स्थिती आहे. राजस्थान रॉयल्सला अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील. अन्यथा राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif