Amol Kale Dies: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन

हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Amol Kale | (Photo Credit - X)

MCA President Amol Kale Passes Away: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी (10 जून) निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी काळे न्यूयॉर्क येथे गेले होते. टी-20 सामन्यांचा आनद घेताना त्यांनी नुकतीच MCA सचिव अजिंक्य नाईक आणि सर्वोच्च परिषद सदस्य सूरज सामंत यांच्यासमवेत रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत पाहिली. या सामन्यात भारताने सहा धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त आले.

MCA मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे काळे चर्चेत

अमोल काळे यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये MCA ची सुत्रे स्वीकारली. एमसीएच्या अध्यक्षपदी आल्यापासून त्यांनी दमदार कामगिरी केली. अनेक उपक्रम सुरु केले. संघटना आणि संस्थेमध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला. एमसीएने त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंना मिळणारे मानधन बीसीसीआयने दिलेल्या मॅच फीच्या बरोबरीने मिळतील याची खात्री करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. (हेही वाचा, India Beat Pakistan In T20 World Cup 2024: भारताने पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला; पराभवाची सर्वात महत्त्वाची तीन कारणे; घ्या जाणून)

शरद पवार यांच्याकडून दु: व्यक्त

अमोल काळे यांच्या निधनाची बातमीकळताच राष्ट्रवादी काँग्रेस (SS) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. काळे यांच्या निधनामुळे धक्क बसला. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुढे नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायमच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ मिळो आमच्या भवाना त्यांच्यासोबत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

क्रिकेट विश्वचषक सामन्यांचे आयोजन

काळे यांच्या कार्यकाळात मुंबईतील वानखेडे स्टेडियम भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीसह 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे अनेक महत्त्वाचे सामने यशस्वीरित्या आयोजित केले गेले. विशेष म्हणजे, स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या उपक्रमाला व्यापक लोकप्रियता मिळाली. काळे यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि मुंबई T20 लीगच्या पुनरुज्जीवनाची योजना आखत होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2023-24 मोसमात रणजी करंडक विजेतेपद पटकावले. याव्यतिरिक्त, वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबर 2023 रोजी, श्रीलंकेविरुद्ध भारताच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्याच्या आधी, क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

एक्स पोस्ट

महान क्रिकेटपटूंबद्दल काळे यांचा आदर होता. 10 जुलै रोजी सुनील गावस्कर यांचा 75 वा वाढदिवस एमसीएने आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यासह साजरा करण्याची योजना सुरू होती. अमोल काळे यांचे मुंबई क्रिकेटमधील योगदान आणि खेळाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील. अमोल काळे यांच्या जाण्याने मुंबई क्रिकेट असोशिएशन तसेच मुंबईतील क्रीडा विश्व आणि क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे सहकारी, निकटवर्तीय आणि राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात आले. त्यांच्या जाण्याने एमसीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. दरम्यान, त्यांचे पार्थीव भारतामध्ये केव्हा आणणार याबातब माहितीची प्रतिक्षा आहे.