मुंबईच्या क्रिकेटपटूवर 3 वर्षांसाठी बंदी, सचिन तेंडुलकर यानेही केले होते त्याच्या खेळीचे कौतुक

त्यांनी त्याबात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने चौकीशी केली. या चौकशीत तो दोषी आढळला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एमसीएने घेतला. मुशीरवर घालण्यात आलेली बंदी 15 जानेवारी 2019 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीसाठी असणार आहे

Musheer Khan | (Photo Credit: File Photo)

मुशीर खान (Musheer Khan) या क्रिकेटपटूवर मुंबई क्रिकेट असोशिएशनने (Mumbai Cricket Association) 3 वर्षांसाठी बंदी घातली आहे. मुशीर खान हा 16 वर्षांखालील मुंबई संघाचा कर्णधार आहे. विजय मर्चंड ट्रॉफी (Vijay Merchant Tournament) स्पर्धेवळी आक्षेपार्ह वर्तन केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एमसीएने (MCA) या निर्णयाची माहिती मुशीर याला पत्रद्वारे दिली. डिसेंबर 2018 मध्ये पार पडलेल्या स्पर्धेतील वर्तन त्याला भोवले. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही मुशीरच्या तडाखेबंद खेळीचे कौतुक केले होते. त्यामुळे तो मैदानावर खेळासाठी उतरला की प्रत्येक वेळी त्याच्याबाबत क्रिकेटप्रेमींनी उत्सुकता असे.

मुशीरला पाठवलेल्या पत्रात एमसीएने काय म्हटले आहे?

मुशीर खान याच्या मैदानावरील वर्तनावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आक्षेप होता. त्यांनी त्याबात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने चौकीशी केली. या चौकशीत तो दोषी आढळला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एमसीएने घेतला. मुशीरवर घालण्यात आलेली बंदी 15 जानेवारी 2019 ते 14 जानेवारी 2022 या कालावधीसाठी असणार आहे. मुशीरसाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण, या बंदीमुळे तो मुंबई क्रिकेट असोसिएशन स्पर्धा आणि बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करु शकणार नाही. (हेही वाचा, हार्दिक पांड्या, के एल राहुल यांच्यावर दोन ODI सामन्यांसाठी बंदी? Koffee With Karan कार्यक्रमातील वक्तव्ये भोवणार?)

विशेष म्हणजे, 'या खेळाडूमध्ये चमक आहे. हा खेळाडू खूप पुढे जाईल', असे उद्गार सचिन तेंडुलकर याने मुशीरबद्धल काढले होते. 2013 मध्ये जुनियर क्रिकेटर म्हणून मुशीर खानचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी सचिनने हे गौरवोद्गार काढले होते.