एमएस धोनी याच्या मिशन काश्मीरला सुरुवात, Army कॅम्पमधील पाहिल्यादिवसाचा फोटो सोशल मीडियावर Viral

धोनीचा सैन्यासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी लष्करी जवानांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

महेंद्र सिंह धोनी आणि सैन्य अधिकारी (Photo Credit: _offl_mahifan/Instagram)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने भारतीय सैन्यासोबत काश्मीरमध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. विश्वचषकमधील निराशाजनक खेळीनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. पण धोनीने याबाबाद कोणतेही भाष्य केले नाही. आणि टीम इंडियासोबत आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जात सैन्यासोबत देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. दोनी 31 जुलै रोजी लष्करी सेवेत रुजू झाला. आणि धोनीचा सैन्यासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत धोनी लष्करी जवानांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत विराट कोहली याला धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी, वाचा सविस्तर)

बुधवारपासून धोनी पॅराशूट रेजिमेंटमध्ये दाखल झाला. याआधी त्याने बेंगळुरूमध्ये काही दिवस सराव देखील केला होता. धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या दरम्यान धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहणार आणि सराव करणार आहे. शिवाय धोनी लष्करातील सर्वात खतरनाक असलेल्या विक्टर फोर्समध्ये धोनी ट्रेनिंग घेईल. आर्मी कॅम्पमध्ये धोनीला पहिल्याच दिवशी जवानांनी घेरल्याचे सोशल मीडियावरील फोटोजमध्ये दिसून आले. धोनी लष्कर सहकाऱ्यांना बॅटवर स्वाक्षरी देखील दिली. पहा हे व्हायरल फोटोज:

धोनीला क्षेत्रीय सेनेच्या पॅराशूट रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. याअंतर्गत धोनी 2015मध्ये पॅराट्रुपरचे ट्रेनिंग घेतले होते. दरम्यान, धोनीज्या विक्टर फोर्समध्ये ट्रेनिंग करणार आहे त्यामधील जवानांची नियुक्ती काश्मीर मधील अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि बडग्राम यासारख्या दहशतवादाचा अधिक प्रभाव असलेल्या ठिकाणी केली जाते.