MS Dhoni यांच्या शेतातल्या भाज्यांची परदेशात मागणी, रांची फार्महाऊस वरून दुबईच्या बाजारात निर्यात करणार भाजीपाला

रिपोर्ट्सनुसार, महेंद्र सिंह धोनी रांची येथील आपल्या फार्महाऊसमध्ये सुमारे 10 एकर जागेवर कोबी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, मटार आणि इतर बरीच भाजीपाला पिकवत आहे. या शेतातील कोबी आणि टोमॅटोला स्थानिक बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

एम एस धोनी (Photo Credit : MSDhoni Facebook page, Archived,)

भारताचा दोन माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आणि नोव्हेंबर महिन्यात आयपीएल (IPL) 2020 च्या समाप्तीनंतर मैदानाबाहेरी कार्यात व्यस्त आहे. टीम इंडियाच्या (Team India) माजी कर्णधाराने आपल्या सेंद्रीय कुक्कुटपालन संस्थेत 2000 काळ्या कडकनाथ कोंबडीचा एक तुकडा मागवून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आणि आता भाजीपाला निर्यातीसाठी बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) रांची (Ranchi) येथील आपल्या फार्महाऊसमध्ये सुमारे 10 एकर जागेवर कोबी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, मटार आणि इतर बरीच भाजीपाला पिकवत आहे. या शेतातील कोबी आणि टोमॅटोला स्थानिक बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जात आहे. माजी भारतीय कर्णधार दुबईमध्येही (Dubai) भाजीपाला विकणार असल्याचे सामन्जले जात आहे. (ICC Team Of The Decade: आयसीसीकडून दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा; भारतीय खेळाडूंकडे तिन्ही संघाचे नेतृत्व)

दुबईच्या बाजारासाठी धोनीचे शेतात पिकविले जाणारे सेंद्रिय अन्न अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरात ऑल सीजन फ्रेश एजन्सी या भाज्या विकणार आहे. ही एजन्सीच्या आखाती देशांमध्ये अनेक भारतीय फळे आणि भाजीपाला वितरण करण्यासाठीही ही एजन्सी जबाबदार आहे. वृत्तामध्ये पुढे म्हटल्यानुसार झारखंडच्या कृषी विभागाने रांची येथून युएईमध्ये ही ताजी सेंद्रिय उत्पादने पाठविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, धोनीने मात्र व्यवसायात स्थिरावण्यासाठी आपल्या उत्पादनाची किंमत बाजारभावाच्या तुलनेत कमी ठेवले असल्याचे म्हटले जात आहे. रांची येथील फळबाजाराच्या जवळच धोनीच्या शेतातील भाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. धोनीने लॉकडाऊन दरम्यान रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता याच शेतीतील भाज्या परदेशात विकल्या जाणार आहेत.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, आयपीएल 2020 नंतर माजी भारतीय कर्णधार दुबईमध्ये पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत सुट्टीचा आनंद लुटत होता आणि नुकतंच मायदेशी परतला. दुबईमध्ये असताना धोनीने नवविवाहित युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यासाठी डिनर आयोजित केले होते, जे त्यांच्या हनिमूनसाठी गल्फ देशात उपस्थित होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif