MS Dhoni Playing Bansuri: एमएस धोनीचा कृष्ण अवतार, CSK ने शेअर केला बासरी वाजविणारा जुना व्हिडिओ (Watch Video)
व्हिडिओ शेअर करुन लोक जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी बासुरी वाजविण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. धोनीची बासरी पकडण्याची शैली आणि त्यातून निघणारी धुन ऐकताना असे दिसते की जणू त्याने याआधीच बासरी वाजवली आहे. कृष्णा जन्माष्टमीवर व्हायरल झालेला होणार हा व्हिडिओ जुना आहे.
MS Dhoni Flute Video On Janmashtami: कोरोना व्हायरसने उत्सवांची चमक फिकट केली असली तरी परंतु लोकांमध्ये अजूनही उत्साह एकसारखाच आहे. यावर्षी जन्माष्टमी (Janmashtami) दोन दिवस साजरी केली जात आहे, 11 आणि 12 ऑगस्ट. बाळ कृष्ण ट्विटरवर देखील ट्रेंड करत आहे. व्हिडिओ शेअर करुन लोक जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) बासुरी वाजविण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रीकृष्णचा (Shri Krishna) जन्मदिवस देशभरात धुमधाक्यात साजरा केला जातो. अशा स्थितीत धोनीचा कृष्ण अवतार सोशल मीडियावर चाहत्यांना पसंत पडलेला दिसत आहे. धोनीची बासरी पकडण्याची शैली आणि त्यातून निघणारी धुन ऐकताना असे दिसते की जणू त्याने याआधीच बासरी वाजवली आहे. कृष्णा जन्माष्टमीवर (Krishna Janmashtami) व्हायरल झालेला होणार हा व्हिडिओ जुना आहे. पण, लोक कृष्णजन्म निमित्त हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. बासरी वाजवताना धोनीने चष्मा घातला होता आणि टीम इंडियाच्या लोगोवाली कॅज्युअल जर्सी घातली होती. (IPL 2020 Update: 16 ऑगस्टपासून एमएस धोनी अॅक्शनमध्ये दिसणार? आयपीएलपूर्वी चेपौक येथे प्रशिक्षण शिबिरासाठी CSKचे तामिळनाडू सरकारला पत्र)
या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे आणखी काही लोकही मागच्या बाजूलाही दिसत आहेत. तथापि, व्हिडिओचे संपूर्ण लक्ष माहीकडे होते. परंतु जर्सीवरून हा व्हिडिओ जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाहा धोनीच्या कृष्ण अवतारातील हा व्हिडिओ:
View this post on Instagram
Minsara Kanna... 😍 #WhistlePodu #HappyJanmashtami
A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on
माजी कर्णधार धोनीला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आले आहे. मागील वर्षी वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यातील पराभवानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान तो काश्मीरमधील दहशतवाद विरोधी युनिटमध्ये तैनात होता. त्याने पॅरा कमांडोच्या बटालियनमध्ये 15 दिवस काम केले आणि तिथेच त्याईनं 15 ऑगस्टही साजरा केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)