MS Dhoni in IPL 2008 Auction: सचिन तेंडुलकरमुळे मुंबई इंडियन्सला नाही मिळाली एमएस धोनीला विकत घेण्याची संधी, अखेरीस CSK ने मारली बाजी
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2008 हंगामात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्र सिंह धोनीला खरेदी केली.तथापि, झारखंडचा क्रिकेटपटू मुंबई इंडियन्सकडून खेळू शकला असता. टीम इंडियाच्या युवा कर्णधाराला कॅप्टन्सीची धुरा मुंबईलाही घ्यायची होती, पण त्यांनी सचिनला 1.65 लाख डॉलर्सवर विकत घेतले होते आणि यामुळे ते धोनीला विकत घेऊ शकले नाही.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2008 हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) खरेदी केली. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे (IPL) जेतेपद जिंकले आणि धोनीला सामील करण्याच्या सीएसकेचा निर्णय योग्य ठरला. तथापि, झारखंडचा क्रिकेटपटू मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळू शकला असता, जर लिलावात काही नियम लागू केले गेले नसते. हंगामाचा पहिला लिलाव म्हणून, मार्की खेळाडू आपापल्या घरच्या फ्रँचायझीमध्ये गेले. सौरव गांगुलीला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले, तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्स, वीरेंद्र सेहवाग दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये गेला. धोनीसाठी घरची फ्रँचायझी नव्हती पण आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना त्याच्यात रस होता. त्यावेळी नुकत्याच टी-20 वर्ल्ड कप टीम इंडियाच्या युवा कर्णधाराला कॅप्टन्सीची धुरा मुंबईलाही घ्यायची होती, पण त्यांनी सचिनला 1.65 लाख डॉलर्सवर विकत घेतले होते आणि यामुळे ते धोनीला विकत घेऊ शकले नाही. (MS Dhoni-Led CSK Leaves For UAE: एमएस धोनी, सुरेश रैनासह चेन्नई सुपर किंग्ज UAE साठी रवाना, RCBने देखील भरले उड्डाण See Pics)
अंकगणितचा हा प्रश एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. “हा अंकगणितचा प्रश्न आहे, त्यावेळी मिस्टर बिंद्रा तिथे होता, युवराजने त्यांच्याकडून खेळवावे अशी पंजाबची इच्छा होती, दिल्लीने (वीरेंद्र) सेहवागला त्यावेळी खेळावे अशी इच्छा होती, मुंबई सचिन तेंडुलकरविना संघाची कल्पनाही करू शकत नव्हता, सचिन दुसर्याकडून कसा खेळू शकतो?”एन श्रीनिवासन PTIशी बोलताना सांगितले. श्रीनिवास यांनीं सांगितले की, “या सर्वांना आयकॉन खेळाडू हवे होते, त्यांना लिलावात सर्वाधिक मानधन देणाऱ्या खेळाडूपेक्षा दहा टक्के जास्त रक्कम मोजावी लागली. त्यामुळे जेव्हा धोनीसाठी बोली लावली जात होती, तेव्हा मी कोणत्याही किंमतीवर धोनीसाठी स्पष्ट होतो,” श्रीनिवास म्हणाले.
त्यावेळी फ्रँचायझींना खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकूण रक्कम 5 लाख डॉलर्स होती. आणि मुंबईने तेंडुलकरला यापूर्वी 1.65 डॉलर्स किमतीवर खरेदी केलं होतं, धोनीला अजून 1.5 लाख डॉलर्स देऊन खरेदी करणं त्यांना परवडलं नाही. दुसरीकडे सीएसकेकडे मार्की प्लेयर नव्हता ज्याला त्यांना 1.65 लाख डॉलर्स द्यावे लागले, आणि त्यांनी लिलावात 1.5 लाख डॉलर्समध्ये धोनीला टीममध्ये सामील केले. सीएसकेवर बंदी घालण्यात आलेल्या दोन हंगामांना वगळता धोनीने आयपीएलमधील सर्व कारकीर्द सीएसकेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि 19 सप्टेंबरपासून आयपीएल सीझन 13 मध्ये पुन्हा पिवळी जर्सी परिधान करेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)