ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी 'टीम इंडिया'ची कॅप्टन कूल धोनीच्या घरी जंगी डिनर पार्टी (Photos)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीमइंडिया झारखंडची राजधानी रांचीमध्ये दाखल झाली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) झारखंडची राजधानी रांचीमध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारी (8 मार्च) ऑस्ट्रेलियासोबत तिसरा सामना खेळला जाईल. त्यापूर्वी टीम इंडियाचे कप्टन कूल महेंद्र सिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) घरी जंगी स्वागत झाले. रांची (Ranchi) येथील धोनीच्या फॉर्महाऊसवर टीम इंडियासाठी खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील काही फोटोज क्रिकेटर्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत कोहलीने लिहिले की, "काल रात्री माही भाईच्या घरी संपूर्ण टीमने खूप एन्जॉय केले. जेवण पण अगदी छान होते. परफेक्ट टीम इव्हीनिंग."
स्पिनर युजवेन्द्र चहल याने देखील डिनर टेबलवरील टीम इंडियाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याने चहलने धोनी आणि साक्षी धोनी दोघांचेही आभार मानले.
यापूर्वी धोनी आपल्या शानदार कारमधून केदार जाधव, ऋषभ पंत यांच्या सोबत निघाला. तेव्हा चाहत्यांनी त्यांच्या भोवती गराडा घातला. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
8 मार्चला रांची येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. मालिका नावावर करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.