बेंगळुरूमध्ये MS Dhoni याची पॅराशूट रेजिमेंटसोबत ट्रेनिंगला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर

बुधवारी, धोनी बटालियनमध्ये सामील झाला.

Mahendra Singh Dhoni (Photo Credits: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. धोनीने भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटसह दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. बुधवारी, धोनी बटालियनमध्ये सामील झाला. याचे मुख्यालय बेंगलुरूमध्ये (Bangaluru) आहे. आयएएनएसशी बोलताना, विकासाच्या माहितीच्या सूत्रांनी सांगितले की, "धोनीने भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे आणि त्याचं लष्कराप्रती असलेलं प्रेमही सर्वांना माहित आहे. भारतीय लष्करासोबत काम करण्याची इच्छा गेली अनेक वर्ष धोनीच्या मनात होती, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला जमले नाही. पण, आता तो लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाला आहे. त्याच्या या कृतीने युवकांमध्ये लष्काराप्रती अधिक जागृतता निर्माण होणार आहे.'' (ICC Test Championship: एमएस धोनी च नाही तर त्याची '7' नंबर जर्सी देखील होऊ शकते निवृत्त, पहा काय म्हणाली BCCI)

धोनी 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत सैन्यासोबत सराव करणार आहे. या कालावधीत धोनी 106 क्षेत्रीय सेनेसोबत राहणार आहे. लष्करातील सर्वात खतरनाक विक्टर फोर्समध्ये धोनी ट्रेनिंग घेणार आहे. या कालावधीत धोनी गार्ड आणि इतर पोस्ट ड्यूटी करणार आहे. भारतीय सैन्यात सराव करता यावा म्हणून धोनीने टीम इंडियाच्या आगामी दौऱ्यामधून दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती. आणि निवड समितीने ती मान्य देखील केली. शिवाय काही दिवसांपूर्वी सैन्य प्रमुख बिपीन रावत यांनी देखील धोनीची पॅराशूट रेजिमेंटसह सराव करण्याची विनंतीला हिरवा कंदील दाखवला. 38 वर्षीय धोनीकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011 मध्ये भारतीय लष्कराने त्याला हा मान दिला होता. तर 2015 मध्ये त्यांनी पॅराट्रूपरची परीक्षा देखील पास केली आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषकनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या आहे. संघ व्यवस्थापनकडून रिषभ पंत ऑस्ट्रेलियातील 2020 वर्ल्ड टी-20 स्पर्धेसाठी तयार होईपर्यंत निवृत्ती न घेण्याचे सांगण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.