MS Dhoni Complete 4000 Runs for CSK: चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी 4000 धावा करणारा महेंद्र सिंह धोनी ठरला दुसरा खेळाडू; मग पहिला कोण? घ्या जाणून

या हंगामात चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी बजावता आली नाही. मात्र, राजस्थान विरुद्ध सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावे एक नव्हेतर दोन विक्रम नोंदवण्यात आले आहेत.

एमएस धोनी (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या हंगामात चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी बजावता आली नाही. मात्र, राजस्थान विरुद्ध सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावे एक नव्हेतर दोन विक्रम नोंदवण्यात आले आहेत. राजस्थान विरुद्ध सामन्यात महेंद्र सिंह धोनीने आयपीएलचा 200 वा सामना खेळला आहे. तसेच चेन्नईच्या संघासाठी 4 हजार धावांचा टप्पा गाठणारा धोनी दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी सुरेश रैनाने (Suresh Raina) अशी कामगिरी बजावली.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्र सिंह धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहेत. धोनीने चेन्नईच्या संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून महेंद्र सिंह धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आठ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या तीन किताब जिंकले आहेत. आयपीएल स्पर्धेत धोनीने एकूण 200 सामने खेळले आहेत. त्यापैकी 30 सामने त्याने पुणे सुपर जॉईंट संघासाठी खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये एकूण 4 हजार 596 धावा केल्या आहेत. यातील 574 धावा त्याने पुण्याच्या संघासाठी केल्या आहेत. तर, 4 हजार 22 धावा त्याने चेन्नईच्या संघासाठी केल्या आहेत. यामुळे चेन्नईच्या संघासाठी 4 हजार धावा करणार धोनी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. तर, याआधी सुरेश रैनाने अशी कामगिरी केली आहेत. हे देखील वाचा- Pravin Dubey Quick Facts: दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याच्या जागी प्रविण दुबे याला संधी; किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सामन्यात करणार आयपीएलमध्ये पदार्पण

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी बजावता आली आहे. राजस्थान विरुद्ध खेळला गेलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला आजही पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान आणखी कठिण झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif