MPL Kit Sponsor of Team India: टीम इंडियाच्या जर्सीवर दिसेल एमपीएल चा लोगो; किट स्पॉन्सरशिप साठी BCCI सोबत गेमिंग अॅपचा 3 वर्षांचा करार
भारतीय क्रिकेट टीमच्या किट प्रायोजकांची जागा आता NIke ऐवजी मोबाईल प्रिमियर लीग स्पोर्ट्सला मिळाली आहे. या ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीसोबत केलेल्या डिलची घोषणा करत बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडियाने याची माहिती दिली.
भारतीय क्रिकेट टीमच्या (India Cricket Team) कीट प्रायोजकांची (Kit Sponsor) जागा आता Nike ऐवजी मोबाईल प्रिमियर लीग स्पोर्ट्सला मिळाली आहे. या ऑनलाईन गेमिंग अॅप कंपनीसोबत केलेल्या डिलची घोषणा करत बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडियाने (Board of Control of Cricket in India) याची माहिती दिली. या पार्टनरशिपमध्ये MPL Sports ने बीसीसीआयसोबत तीन वर्षांसाठी करार केला आहे. हा करार नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2023 या कालावधीपर्यंत असेल. काही दिवसांमध्येच सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 सिरीजपासून भारत क्रिकेट टीमच्या जर्सीवर एमपीएलचा (MPL) नवा लोगो दिसेल. भारतीय क्रिकेट टीम व्यतिरिक्त भारतीय महिला क्रिकेट टीम आणि अंडर-19 क्रिकेट टीम यांच्या किट्सचे लोगो सुद्धा बदलण्यात येतील.
"भारतीय क्रिकेट टीममध्ये एक मोठी घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे की, भारतीय क्रिकेट टीमच्या (पुरुष आणि महिला) ऑफिशियल कीटचे प्रायोजक 2023 पर्यंत MPL असणार आहे. MPL Sports हे टीमच्या कीटमध्ये एक नवे पर्व ठरेल. त्याचप्रमाणे बीसीसीआयचे licensed merchandise जगभरातील करोडो टीम इंडियाच्या चाहत्यांना सहजरित्या पुरवण्याचे काम करेल," अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.
BCCI Tweet:
भारतीय क्रिकेट टीमच्या कीटचे जुने प्रायोजक Nike यांनी करार वाढवण्यास नकार दिल्याने बीसीसीआयने किटच्या स्पॉन्सरशिपसाठी लिलाव ठेवला होता. MPL Sports या लिलावाचे विजेते ठरले असून पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक सामन्यामागे बीसीसीआयला 65 लाख रुपये देतील. (IND vs AUS 2020-21: ‘विराट कोहलीचा द्वेष करायला आवडतं, पण फॅन म्हणून त्याची फलंदाजी आवडते’, ऑस्ट्रेलियाई कर्णधार टिम पेनचे विधान)
कोरोना व्हायरसच्या काळानंतर ऑस्ट्रेलिया दौरा हा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आठवणीमुळे विराट कोहलीच्या टीमचा आत्मविश्वास तगडा आहे. आधीच्या दौऱ्यामध्ये टी-20 सिरीज 1-1 अशी बरोबरीत झाली असून वनडे आणि टेस्ट सिरीज भारताने जिंकली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)