Mohammed Shami: पाकिस्तानकडून पराभवानंतर धर्माच्या आधारे टार्गेट करणाऱ्या ट्रॉलर्सना मोहम्मद शमीचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला - ‘आम्ही देशासाठी लढतो’
धर्माच्या आधारावर त्याच्याविरुद्ध अपमानास्पद गोष्टी बोलल्या गेल्या. आता या संदर्भात मोहम्मद शमीची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकारच्या विचारसरणीला इलाज नाही असे तो म्हणाला.
ICC टी-20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) भारताचा (India) पराभव झाल्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) टार्गेट केले होते. धर्माच्या (Religion) आधारावर त्याच्याविरुद्ध अपमानास्पद पोस्ट शेअर केल्या गेल्या. आता या संदर्भात शमीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकारच्या विचारसरणीला इलाज नाही असे तो म्हणाला. तसेच धर्माच्या आधारे ट्रोल करणारे खरे चाहते आणि खरे भारतीयही नाहीत, असे एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना मोहम्मद शमीने म्हणाला. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत शमीवर निशाणा साधणाऱ्या ट्रॉलर्स विरोधात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शमीचा बचाव केला आणि खोडसाळ बोलणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आयसीसी (ICC) वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाला पहिल्यांदा पाकिस्तानकडून पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे.
आणि पुरुष टी-20 विश्वचषक 2021 मध्ये कट्टर-प्रतिस्पर्धी बाबर आजमच्या नेतृत्वातील पाकिस्तानविरुद्ध भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय वेगवान गोलंदाज शमी ऑनलाइन ट्रोल्सचे मुख्य निशाणा बनला. शमीच्या सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेशांचा भडिमार झाला, त्याला देशद्रो देखील म्हटले गेले आणि त्याने पाकिस्तानकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, जवळपास प्रत्येक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू शमीच्या समर्थनार्थ पुढे आला आणि भारताचा माजी कर्णधार कोहलीने पत्रकार परिषदेत ऑनलाइन ट्रोल्सला फटकारले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी म्हणाला, “जेव्हा अनोळखी सोशल मीडिया प्रोफाइल असलेले किंवा काही फॉलोअर्स असलेले यूजर्स एखाद्याकडे बोट दाखवतात तेव्हा त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते, त्यांच्यासाठी काही धोक्याचे नसते कारण ते कोणीही नाहीत… आम्हाला त्यांच्याशी गुंतण्याची गरज नाही.”
यादरम्यान, शमी पुढे म्हणाला की तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. “आम्ही काय आहोत हे आम्हाला माहित आहे, आम्हाला भारताचा अर्थ काय आहे हे सांगण्याची गरज नाही कारण आम्ही देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि देशासाठी लढतो. त्यामुळे अशा ट्रोल्सवर बोलून किंवा प्रतिक्रिया देऊन आम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही.”