लॉकडाऊनमध्ये घरी परतणाऱ्या मजूरांच्या मदतीसाठी धावला मोहम्मद शमी, BCCI ने व्हिडिओ शेअर करून केलं कौतुक
शमीने सहसपूर येथील आपल्या निवासस्थानाबाहेर अन्न वितरण स्टॉलही उभारला आहे.
लॉकडाऊनमध्ये (Lockdown) मजुरांच्या स्थलांतराचा (Migrant Workers) प्रश्न गंभीर होत चालला आहे. भारतीय रेल्वेने खास 'श्रमिक एक्सप्रेस' ट्रेन सुरु केल्या असल्या तरी अनेक कामगार पायी घरी जाताना दिसत आहे. अशा मजुरांसाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने पुढाकार घेतला. शमी सध्या त्याची पत्नी हसीन जहांच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे चर्चेत आला आहे. पण, शमीने याकडे दुर्लक्ष करून समाजकार्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याचे कौतुकही केले जात आहे. शमी उत्तर प्रदेशात आपल्या गावी अन्नधान्याचे वितरण स्टॉल्स लावून कोविड-19 (COVID-19) विरुद्ध लढायला मदत करत आहे. उत्तर प्रदेशात शमीने नॅशनल हायवे 24 वर मास्क आणि खाद्य वितरणासाठी स्टॉल्स लावले आहेत. याऐवजी शमीने सहसपूर येथील आपल्या निवासस्थानाबाहेर अन्न वितरण स्टॉलही उभारला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी एक क्लिप शेअर केली आहे ज्यात शमी आपल्या गावी रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवासी कामगारांना खाद्य पाकिटं वाटताना दिसत आहे. (मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां ने शेअर केला न्यूड फोटो, क्रिकेटरसाठी लिहिलेली पोस्ट पाहून संतप्त फॅन्सनी फटकारले)
"भारत कोरोनाविरुद्ध लढत असताना मोहम्मद शमी उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 वर अन्न पॅकेट आणि मास्क वाटून घरी पोहोचण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. सहसपूरमध्ये त्यांनी घराजवळ अन्न वितरण केंद्रेही सुरू केली आहेत." बीसीसीआयने म्हटले की, “आम्ही यामध्ये एकत्र आहोत.” शमीने बीसीसीआयच्या या ट्विटचे आभार मानले. या स्टार गोलंदाजाने प्रतिक्रिया देत म्हटले, "धन्यवाद बीसीसीआय, हे माझे कर्तव्य होते."
अनेक भारतीय खेळाडू देशाला कोरोना व्हायरस उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. कोविड-19 महामारीने जगभरातील सर्व नागरिकांचे जीवन थांबले आहे. लॉकडाऊनवरील निर्बंध कमी होत असतानाही देशभरातील स्थलांतरित कामगारांचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्य शहरांमधून आपापल्या गावी परत जाण्याच्या प्रयत्नात त्यांनी केवळ त्यांची उपजीविकाच नाही तर अनेकांचे आपला जीव गमावला आहे. मागील महिन्यात घरी परतणारा एक कामगार शमीच्या घरासमोर येऊन चक्कर येऊन पडला. शमीने त्वरित त्याला मदत करून खाण्यासाठी अन्न पुरवले.