Mahela Jayawardene New MI Head Coach: मार्क बाउचरची मुंबईमधून हकालपट्टी, श्रीलंकेच्या महेला जयवर्धने यांच्याकडे पुन्हा मुख्य प्रशिक्षकाची कमान
संघाने मार्क बाउचरला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवले आहे. बाउचर आता पुढच्या मोसमात मुंबईसाठी प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसणार नाही.
Mahela Jayawardene New Mumbai Indians Head Coach: आयपीएल 2025 संदर्भात दररोज काही मोठे अपडेट्स समोर येत आहेत. काही काळापूर्वी बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा लिलावाचे नियम जाहीर केले होते. आता मेगा लिलावापूर्वी आयपीएल चॅम्पियन फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक मुंबई इंडियन्सने आपल्या प्रशिक्षक संघात मोठा बदल केला आहे. संघाने मार्क बाउचरला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवले आहे. बाउचर आता पुढच्या मोसमात मुंबईसाठी प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसणार नाही. मुंबईने बाउचरच्या जागी श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांची संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जयवर्धने आता आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसतील.
महेला जयवर्धने पुन्हा मुंबईचा प्रशिक्षक
मुंबई इंडियन्सने श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूला प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जयवर्धने यांनी 2017 ते 2022 पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली. जयवर्धनेच्या प्रशिक्षणाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. (हे देखील वाचा: IPL 2025: काय सागतां! मुंबई इंडियन्स या 3 कारणांमुळे रोहित शर्माला ठेवणार कायम, जाणून घ्या काय आहे मोठे कारण)
मार्क बाउचरची हक्कलपट्टी
दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाउचरच्या जागी महेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2024 मध्येच मुंबई इंडियन्सने मार्क बाउचरला त्यांचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनवले होते. तथापि, त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी खूपच खराब होती आणि मुंबई संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर होता. जयवर्धनेला आता मुंबईत नवा उत्साह वाढवायचा आहे जेणेकरून संघ पूर्वीप्रमाणेच आयपीएल 2025 पासून त्याच लयीत दिसावा.