T20 World Cup 2024 Opening Ceremony: उद्घाटन सोहळ्यात अनेक स्टार्स करणार परफॉर्म, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
टी-20 विश्वचषक 2024 चा उद्घाटन सोहळा टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे. भारतातील उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) 2 जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी 2 सामने खेळवले जातील. पहिल्या सामन्यात अमेरिकेचा सामना कॅनडाशी (USA vs CAN) तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना पापुआ न्यू गिनीशी होणार आहे. अमेरिका (USA) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत 20 संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. सर्व संघांची प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी उद्घाटन समारंभ होईल. या काळात अनेक स्टार्स परफॉर्म करताना दिसणार आहेत. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Timing: शनिवारपासून टी-20 विश्वचषकाला होणार सुरुवात, जाणून घ्या भारतात किती वाजता सुरू होतील सामने)
हे स्टार्स करतील परफॉर्म
टी-20 विश्वचषक 2024 चा उद्घाटन सोहळा टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे. भारतातील उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. त्रिनिदादियन गायक डेव्हिड रुडर, रवी बी, संगीतकार आणि गीतकार इरफान अल्वेस, गायक डीजे आना आणि अल्ट्रा सिम्मो उद्घाटन समारंभात सादरीकरण करताना दिसतील.
यंदाच्या टी-20 विश्वचषकात 20 संघ सहभागी
यंदाच्या टी-20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होत आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, युगांडा, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.
20 संघांत करण्यात आले चार गट
अ गट: भारत, पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा.
ब गट: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान.
क गट: वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी.
ड गट: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)