IPL 2025 Retention Rules: रिटेनशन नियमात मोठे बदल, आता 5 खेळाडूंना ठेवता येईल कायम; RTM कार्डचाही होणार वापर
त्यानंतरच मेगा लिलावात संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतात हे स्पष्ट होईल. याशिवाय बीसीसीआयला राईट टू मॅच अर्थात आरटीएमच्या पर्यायाबाबतही (RTM Card) निर्णय घ्यायचा आहे.
BCCI IPL Retentions Rule: आयपीएल 2025 साठी (IPl 2025) चाहते खूप उत्सुक आहेत. आयपीएलचा मेगा लिलाव या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर बीसीसीआय (BCCI) लवकरच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी नियम (Retention Rules) जाहीर करू शकते. त्यानंतरच मेगा लिलावात संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतात हे स्पष्ट होईल. याशिवाय बीसीसीआयला राईट टू मॅच अर्थात आरटीएमच्या पर्यायाबाबतही (RTM Card) निर्णय घ्यायचा आहे. त्याचवेळी, आता रिटेनशन आणि आरटीएमच्या नियमांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
जास्तीत जास्त एकूण 5 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतो
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल लिलावापूर्वी सर्व 10 संघांना 5-5 खेळाडू कायम ठेवण्याची निर्णय घेतला जावू शकतो. याशिवाय, संघ एकदा राईट-टू-मॅच कार्ड देखील वापरू शकतात. मात्र, संघ किती भारतीय आणि किती विदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकतील हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी आयपीएलमध्ये 4 खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम होता. वृत्तांवर विश्वास ठेवला तर बीसीसीआय आता हा नियम बदलू शकते. याशिवाय राईट टू मॅच कार्डचा नियमही परत येऊ शकतो.
हे देखील वाचा: IPL 2025: आयपीएल खेळणारे खेळाडू होणार मालामाल; आता एवढी असेल खेळाडूंची मॅच फी
नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो मेगा लिलाव
आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. अहवालांवर विश्वास ठेवला तर, आयपीएल मेगा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटी भारताबाहेरील शहरात होऊ शकतो.
यावेळी केकेआरने आयपीएलचे विजेतेपद पटकावले
यावेळी आयपीएलचे जेतेपद श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत हैदराबादचा पराभव केला. केकेआरचे हे तिसरे विजेतेपद ठरले. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. दोन्ही संघांनी 5-5 वेळा जेतेपद पटकावले आहे.