LSG vs RCB Ekana Cricket Stadium Pitch Report: एकाना खेळपट्टीवर फलंदाज वर्चस्व की गोलंदाज करतील कमाल? खेळपट्टीचा अहवाल पहा

आयपीएल 2025 चा शेवटचा लीग सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तर, एलएसजी स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

LSG vs RCB Ekana Cricket Stadium Pitch Report: एकाना खेळपट्टीवर फलंदाज वर्चस्व की गोलंदाज करतील कमाल? खेळपट्टीचा अहवाल पहा
Ekana Cricket Stadium Lucknow (Photo Credit - Twitter)

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru Ekana Cricket Stadium Pitch Report: आयपीएल 2025 चा शेवटचा लीग सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (LSG vs RCB) यांच्यात खेळला जाणार. हा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आरसीबीने आधीच टॉप-4 मध्ये स्थान मिळवले आहे. परंतु हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. हा सामना जिंकून आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये पोहोचण्याची संधी मिळेल. तर लखनौदेखील या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, एलएसजी विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान एकाना खेळपट्टीची स्थिती काय असेल हे जाणून घेऊयात.

स्टेडियमचा खेळपट्टी अहवाल

लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोललो तर ती फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. येथे डावाच्या सुरुवातीला फलंदाजांना फटके खेळणे सोपे नसते. मात्र, जर फलंदाजाने मोठा वेळ क्रीजवर घालवला तर त्याला शॉट्स खेळणे सोपे होते. या दिवसांत लखनौमध्ये रात्री दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरेल. येथे जो कर्णधार नाणेफेक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

स्टेडियमवरील आकडेवारी

आयपीएलमध्ये या मैदानाचा सरासरी स्कोअर 168-190 च्या दरम्यान राहीला आहे. जर आपण आयपीएलमधील एकाना स्टेडियमच्या आकडेवारीबद्दल बोललो तर, येथे आतापर्यंत एकूण 21 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 सामने जिंकले आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 11 सामने जिंकले. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आतापर्यंत 13 सामने जिंकले आहेत. तर पराभूत संघाने 7 वेळा सामना जिंकला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. 224 मध्ये एलएसजीविरुद्ध त्यांचा 235 धावा आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत या मैदानावर एकही शतक झळकावलेले नाही.

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2025 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).