विराट कोहली 12 मे रोजी गुरुग्राम येथून मतदान करणार

तर अनेक कलाकार आणि खेळाडू मतदान सर्वांनी करावे यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करत आहेत.

Virat Kohli (Photo Credits-Instagram)

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तर अनेक कलाकार आणि खेळाडू  मतदान सर्वांनी करावे यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करत आहेत. मुंबई संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्याबद्दल त्याने सोशल मीडियावर एका स्टेटसच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

विराटने इन्स्टाग्रामवर आपल्या मतदान कार्डाचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला असून त्यावर त्याने गुरुग्राम (Gurugram) येथून मतदान करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तर येत्या 12 मे रोजी विराट मतदान करणार आहे. विराट याचा जन्म दिल्ली येथील आहे. मात्र काही दिवसांपूर्वी विराट हा गुरुग्राम येथे राहत आहे. त्यामुळे विराटचे नाव गुरुग्राम येथील मतदार यादीत आहे.('बाहेर पडा आणि मत द्या', असे म्हणत सचिन तेंडूलकर याचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन watch Video)

देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामधील सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे रोजी पार पडणार आहे. तर बिहार (8), हरियाणा (10),झारखंड (4),मध्यप्रदेश(8), उत्तरप्रदेश (14), पश्चिम बंगाल (8) आणि दिल्ली-एनसीआर येथे (7) जागांसाठी मतदान पार पडणार आहे.



संबंधित बातम्या

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar: अमोल कीर्तिकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा झटका; रवींद्र वायकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

IND W vs WI W 3rd T20I 2024 LIVE Streaming: टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार, प्लेइंग 11, खेळपट्टीचा अहवाल आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील घ्या जाणून

ZIM vs AFG 2nd ODI 2024 Toss Update: अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग 11

South Africa vs Pakistan ODI Head To Head: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात कोणाचे वर्चस्व, पहा हेड टू हेड आकडेवारी

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif