IND W vs NZ W, Women's T20 World Cup 2020 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर
हा सामना मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनवर पाहिले जाऊ शकते.
यजमान आणि गतजेता ऑस्ट्रेलिया, आणि नंतर बांग्लादेशला महिला टी-20 विश्वचषकच्या पहिल्या दोन सामन्यात पराभूत केल्यावर भारतीय महिला टीमचा आत्मविश्वास उंचावला असेल. उत्साहाने भरलेला भारतीय महिला संघ (India Women's Cricket Team) गुरुवारी (27 फेब्रुवारी) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपच्या (Women's T20 World Cup) आजच्या सामन्यात विजयाची हॅटट्रिक पूर्ण करुन सेमीफायनल फेरी गाठण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 आणि बांग्लादेशविरुद्ध 18 धावांनी जिंकण्यासाठी भारतीय संघाला तितका संघर्ष करावा लागला नाही. दोन सामन्यांपैकी चार गुणांसह पाच संघांच्या गटात भारत सध्या अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवत हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील संघ सेमीफायनल फेरीच्या जवळ पोहचेल, जो गट ‘अ’ आणि ‘ग्रुप बी’ मध्ये दोन संघांमधील पहिल्या दोन संघांमध्ये होईल.
भारत-न्यूझीलंड महिला टी-20 विश्वचषक सामना गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता होईल. टॉस सकाळी 9.00 वाजता होईल. हा सामना मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शनवर पाहिले जाऊ शकते. या सामन्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग भारतात हॉटस्टारवर पहिले जाऊ शकते.
पहिल्या दोन सामन्यात भारताने गोलंदाजीत चमकदार कामगिरी बजावली, परंतु फलंदाजीमध्ये हरमनप्रीत आणि सलामी फलंदाज स्मृती मंधाना कडून मोठ्या डावाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, कर्णधार सोफी डिवाइन, सुझी बेट्स, ली ताहुहू आणि अमेलिया केरच्या रुपात काही उच्च स्तरीय खेळाडू आहेत. व्हाइट फर्न्सचा हा दुसरा सामना आहे. किवी संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला सात विकेटने सहज पराभूत केले होते.
असे आहे भारत-न्यूझीलंड महिला संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, स्मृति मंधाना, शिखा पांडे, अरुंधति रेड्डी, जेमिमाह रॉड्रिक्स, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा, पूनम यादव आणि राधा यादव.
न्यूझीलंड: सोफी डिवाइन (कॅप्टन), रोजमेरी मेयर, अमेलिया केर, सूजी बेट्स, लॉरेन डाउन, मैडी ग्रीन, होली हडलस्टन, हेले जेन्सेन, लीग कास्पेरेक, जेस केर, केटी मार्टिन (विकेटकीपर), केटी पर्किन्स, अन्ना पीटरसन, रेचेल प्रीस्ट, ली ताहुहु.