सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे Live स्कोरकार्ड

प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, हैदराबादने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे Live स्कोरकार्ड
SRH vs DC (Photo Credit- X)

SRH vs DC IPL 2025 55th Match: आयपीएल 2025 चा 55 वा (IPL 2025) सामना 5 मे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, हैदराबादने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2025 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).