IND vs NZ 1st T20I Highlights: टीम इंडियाने राखला ऑकलँडचा गड, न्यूझीलंडविरुद्ध 6 विकेटने मिळवला विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना आज ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर थोड्याच वेळात सुरु होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मालिकेचा पहिला सामना जिंकून किवी संघावर सुरुवातीपासूनच दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करेल

24 Jan, 21:17 (IST)

न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँडच्या इडन पार्कमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने यजमान किवी संघाचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतासमोर विजयासाठी 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून केएल राहुल याने 56 आणि कर्णधार विराट कोहली याने 45 धावा केल्या.  भारतडकून श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे नाबाद परतले. श्रेयसने 29 चेंडूत 58 , तर मनीषने 14 धावा केल्या. 

24 Jan, 20:57 (IST)

भारतीय अष्टपैलू फलंदाज शिवम दुबे चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 9 चेंडूत 13 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. ईश सोधीच्या चेंडूवर टिम साऊदीने दुबेचा झेल पकडला.

24 Jan, 20:44 (IST)

भारतीय कर्णधार विराट कोहली 32 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावा करून ब्लेअर टिकनरचा बळी ठरला. मार्टिन गप्टिलने कोहलीचा झेल पकडला आणि पॅव्हिलिअनचा रस्ता दाखवला. 

24 Jan, 20:35 (IST)

204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताला ईश सोढीने दुसरा धक्का दिला. सोढीने सलामी फलंदाज केएल राहुलला 56 चेंडूवर टिम साऊथीकडे कॅच आऊट केले. भारताने 115 धावांवर दुसरी विकेट गमावली. 

24 Jan, 20:28 (IST)

ब्लेअर टिकनरच्या ओव्हरमध्ये षटकार मार्ट टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुलने 10 वे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. राहुल 24 चेंडूत 54 आणि कर्णधार विराट कोहली 25 चेंडूत 39 धावा करून खेळत आहे. 

24 Jan, 20:16 (IST)

न्यूझीलंडने दिलेल्या 204 धावांच्या लक्ष्याच्या उत्तरात पहिल्या पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने एक विकेट गमावून 65 धावा केल्या आहेत. केएल राहुल 29 आणि कर्णधार विराट कोहलीने संघासाठी 26 धावा करून खेळत आहे. 

24 Jan, 19:55 (IST)

न्यूझीलंडने दिलेल्या 204 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 16 धावांवर पहिला धक्का बसला. मिशेल सेंटनरने सलामी फलंदाज रोहित शर्माला रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. रोहितने आज 6 चेंडूंचा सामना करत 7 धावा केल्या. 

24 Jan, 19:35 (IST)

ऑकलंडच्या ईडन पार्क येथील पहिल्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 203 धावा केल्या आणि भारतासमोर धावांचे 204 लक्ष्य दिले. छोटी बाउंड्री असल्याने या सामन्यात मोठे षटकार आणि चौकार पाहायला मिळाले. किवीकडून कॉलिन मुनरोयाने अर्धशतकी  खेळी केली. किवींकडून रॉस टेलर आणि मिशेल सॅंटनर अनुक्रमे 54 आणि 2 धावांवर नाबाद परतले.

24 Jan, 19:16 (IST)

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ने टीम इंडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पहिले अर्धशतक झळकावले. पण, त्याच्या पुढील चेंडूवर विल्यमसनने युजवेंद्र चहलच्या चेंडूवर विराट कोहलीकडे कॅच आऊट झाला.विल्यमसन ने 51 धावा केल्या. 

24 Jan, 18:55 (IST)

टीम इंडियाने न्यूझीलंडला सलग दुसरा झटका दिला. रवींद्र जडेजाने १२.२ ओव्हरमध्ये कॉलिन डी ग्रैंडहोमला शिवम दुबेकडे कॅच आऊट केले आणि यजमान संघाला तिसरे धक्का दिला. कॉलिनने 2 चेंडूंचा सामना केला. 

24 Jan, 18:51 (IST)

शार्दूल ठाकूरने भारताला दुसरे यश मिळवून दिले. शार्दूलने न्यूझीलंडचा दुसरा सलामी फलंदाज कॉलिन मनरोला युजवेंद्र चहलकडे कॅच आऊट केले. मनरोने 42 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. 

24 Jan, 18:33 (IST)

भारतीय अष्टपैलू शिवम दुबेने पहिले फलंदाजी करणाऱ्यान्यूझीलंडला पहिला धक्का दिला. दुबेने किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलला बाउंड्री लाईनवर रोहित शर्माकडे कॅच आऊट केले. गप्टिलने 19 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 30 धावा केल्या. 

24 Jan, 18:23 (IST)

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडने सहा षटकांनंतर एकही विकेट न गमावता 68 धावा केल्या. संघाकडून मार्टिन गप्टिल 28 आणि कोलिन मुनरो 34 धावा करून खेळत आहेत.

24 Jan, 18:08 (IST)

भारतविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला सलामी जोडी मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो ने चांगली सुरुवात करून दिली. दोंघांनी 3 ओव्हरमध 26 धावा केल्या. गप्टिल 9 आणि मुनरो 15 धावा करून खेळत आहे. 

24 Jan, 18:00 (IST)

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताकडून पहिली ओव्हर टाकली. बुमराहच्या या षटकात किवी फलंदाजांनी एक चौकार, दोन एकेरी आणि एक चौकार याच्या मदतीने एकूण 7 धावा केल्या. मार्टिन गप्टिल 5 आणि कोलिन मुनरो 1 धावा करून खेळत आहेत.

24 Jan, 17:54 (IST)

जसप्रीत बुमराह ने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलने शानदार चौकार मारला. 

24 Jan, 17:36 (IST)

ऑकलँडच्या इडन पार्कमधील न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताने प्लेयिंग इलेव्हनमधून रिषभ पंतला डच्चू दिला असून त्याच्या जागी मनीष पांडेला जागा दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंतला दुखापत  त्यानंतर त्याची किवी दौऱ्यावर निवड करण्यात अली आहे. 

24 Jan, 17:22 (IST)

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-20 सामना ऑकलंडच्या इडन पार्कवर थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली ने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना आज ऑकलंडच्या ईडन पार्क (Eden Park) मैदानावर थोड्याच वेळात सुरु होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मालिकेचा पहिला सामना जिंकून किवी संघावर सुरुवातीपासूनच दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करेल, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) ही विजयासह मालिकेची सुरुवात करू इच्छित असेल. जानेवारीतच भारतीय संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. दुसरीकडे न्यूझीलंडला घरी खेळण्याचा फायदा मिळेल. कीवी संघ घरच्या मैदानावर खेळताना अत्यंत मजबूत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ (Indian Team) आणि त्यांच्यात कठोर स्पर्धा पाहायला मिळेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

मालिकेत दोन्ही संघ एकमेकांना कठोर स्पर्धा देताना दिसतील. भारतीय संघ किवी दौऱ्यावर टी-20, वनडे आणि कसोटी असं तिन्ही मालिका खेळणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळतील. शिखर धवनला दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे, त्यामुळे केएल राहुल रोहित शर्मासह डावाची सुरुवात करेल, आणि तोच विकेटकिपिंगचीही जबाबदारी सांभाळेल असे कर्णधार विराटने स्पष्ट केले. तर मधल्या फळीत मनीष पांडे किंवा रिषभ पंतपैकी एकाला फलंदाज म्हणून स्थान मिळू शकते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा आत्मविश्वास थोडा कमकुवत दिलेत आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांचा क्लीन स्वीप केला होता. सध्याच्या मालिकेतही संघासमोर अडचणी कमी नाहीत. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री आणि जिमी नीशम यांना दुखापतीमुळे बाहेर करण्यात आले आहे. मात्र, कर्णधार केन विल्यमसन या मालिकेतून पुनरागमन करीत आहे, जो संघासाठी दिलासादायक बाब आहे.

असा आहे भारत न्यूझीलंड संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी आणि ब्लेअर टिकनर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now