T20 World Cup 2022: लिटन दासने भारताविरुद्ध खेळली शानदार खेळी, विराट कोहलीने त्याला दिली अप्रतिम भेट
लिटन दासची खेळी सर्वांनाच भावली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मॅचनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपली एक बॅट या स्टार बांगलादेशी बॅट्समनला गिफ्ट केली आहे. या सामन्यात कोहलीनेही चांगला खेळ दाखवला.
भारतीय संघाने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध (IND vs BNG) महत्त्वपूर्ण विजय मिळाल्यानंतर टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील त्यांचा मार्ग सुकर झाला. या सामन्यात भारताला विजयासाठी खूप घाम गाळावा लागला. 60 धावांची तुफानी खेळी करणारा लिटन दास (Liton Das) भारतासाठी सर्वात मोठी समस्या बनला होता. लिटन दासची खेळी सर्वांनाच भावली. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मॅचनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपली एक बॅट या स्टार बांगलादेशी बॅट्समनला गिफ्ट केली आहे. या सामन्यात कोहलीनेही चांगला खेळ दाखवला. विराट कोहलीने 44 चेंडूत 64 धावा केल्या ज्यात 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. दोन आघाडीच्या फलंदाजांमधील या भेटवस्तू नातेसंबंधाने चाहत्यांची मने जिंकली आणि त्यांनी कोहलीचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
लिटन दासच्या खेळीने भारतीय खेळाडूंसमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. पावसापूर्वी भारतीय गोलंदाजाने त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर केएल राहुलने त्याला शानदार धावबाद केले आणि येथून सामना पूर्णपणे फिरला. (हे देखील वाचा: IND vs ZIM: पुढील सामन्यात 'या' चार फलंदाजावर असु शकते नजर, उपांत्य फेरीतही दाखवु शकतात आपली कमाल)
लिटन दास हा बांगलादेशचा सलामीचा फलंदाज आहे. या विश्वचषकात त्याने संघासाठी चांगली खेळी केली आहे. दास हे श्रीकृष्णाचे परम भक्त आहेत. याची माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्राम बायोवरही दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2022 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

