Legends League Cricket 2022: वीरेंद्र सेहवागकडे इंडियन महाराज तर मिसबाह-उल-हक कडे आशिया लायन्सची कमान; वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंग, प्रसारणची माहिती जाणून घ्या
क्रिकेट विश्वातील काही मोठी नावे 22-यार्डच्या पट्टीवर पुन्हा एकत्र येण्यास सज्ज आहेत. 20 जानेवारी रोजी लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू निवृत्तीनंतर झळकण्यास सज्ज आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागस्पर्धेत भारतीय महाराज संघाचे नेतृत्व करेल. या लीगच्या सुरुवातीपूर्वी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंग, प्रसारणची माहिती खालीलप्रमाणे आहे.
Legends League Cricket 2022: क्रिकेट विश्वातील काही मोठी नावे 22-यार्डच्या पट्टीवर पुन्हा एकत्र येण्यास सज्ज आहेत. 20 जानेवारी रोजी लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) जगभरातील दिग्गज खेळाडू निवृत्तीनंतर झळकण्यास सज्ज आहे. युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), हरभजन सिंह, इरफान पठाण इत्यादी भारतीय महाराज संघाची जर्सी परिधान करतील. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग बुधवारपासून सुरू होणाऱ्या लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC) टी-20 स्पर्धेत भारतीय महाराज (India Maharaja) या माजी भारतीय क्रिकेटपटूंच्या संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, चामिंडा वास इत्यादी खेळाडू या स्पर्धेत आशिया लायन्सकडून खेळणार आहेत. जागतिक दिग्गज संघ देखील सहभागी होणार आहे ज्यात डॅरेन सॅमी, डॅनियल व्हिटोरी, ब्रेट ली, जॉन्टी रोड्स, केविन पीटरसन इत्यादी खेळाडू देखील आपला जलवा दाखवताना दिसतील. या लीगच्या सुरुवातीपूर्वी स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंग, प्रसारणची माहिती खालीलप्रमाणे आहे.
10 दिवस आयोजित केली जाणारी स्पर्धा ओमानमधील मस्कत येथील ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर होणार आहे. लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 पूर्ण वेळापत्रक (सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता):
20 जानेवारी: भारत महाराज विरुद्ध आशिया लायन्स
21 जानेवारी: वर्ल्ड जायंट्स विरुद्ध आशिया लायन्स
22 जानेवारी: वर्ल्ड जायंट्स विरुद्ध भारत महाराज
24 जानेवारी: आशिया लायन्स विरुद्ध भारत महाराज
२६ जानेवारी: भारत महाराज विरुद्ध वर्ल्ड जायंट्स
27 जानेवारी: आशिया लायन्स विरुद्ध वर्ल्ड जायंट्स
29 जानेवारी: फायनल
लिजेंड्स लीग क्रिकेट 2022 चे तीन संघ खालीलप्रमाणे आहेत...
इंडियन महाराज: वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंह, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया, आणि अमित भंडारी.
आशिया लायन्स : शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कालुविथरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल, असगर अफगाण.
वर्ल्ड जायंट्स: डॅरेन सॅमी, डॅनियल व्हिटोरी, ब्रेट ली, जॉन्टी रोड्स, केविन पीटरसन, इमरान ताहिर, ओवेस शाह, हर्शल गिब्स, अल्बी मॉर्केल, मॉर्नी मॉर्केल, कोरी अँडरसन, मॉन्टी पानेसर, ब्रॅड हॅडिन, केविन ओब्रायन आणि ब्रेंडन टेलर.
लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 टेलिकास्ट आणि लाइव्ह स्ट्रीमिंग:
लिजेंड्स लीग क्रिकेट 2022 भारतीय प्रेक्षकांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केले जाईल. सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 हे सामने थेट प्रसारित करतील. तर स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv वर उपलब्ध असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)